अभिनेत्री बारीक, सडपातळ असाव्या हा बॉलीवूडचा नियम होता. पण करिना कपूर जेव्हा बॉलीवूडमध्ये आली तेव्हा तिने हा नियम थोडा बदलला आणि आणखी पुढे नेऊन ठेवला. कारण बॉलीवूडमध्ये ती झीरो फिगरचा ट्रेण्ड घेऊन आली होती. तिच्या झीरो फिगरने तेव्हा अनेकांना वेड लावलं होतं. कित्येक सर्वसामान्य तरुणीही तिच्याप्रमाणे झीरो फिगर मिळविण्यासाठी धडपडत होत्या. आता त्यावेळी तिने झीरो फिगर मिळवली म्हणजे कोणतं तरी कडक डाएट केलं असणार असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत करिनाने स्वत:च सांगितलं आहे की सर्वसामान्य लोकांना जो पदार्थ पाहून वजन वाढण्याची चिंता वाटते (Kareena Kapoor's Most Favourite Food), नेमका तोच पदार्थ खाऊन तिने वजन घटवलं आणि झीरो फिगर मिळवली. बघा असा कोणता हा जादुई पदार्थ आहे..(Kareena Kapoor maintained her zero figure by eating 'this' food)
करिना कपूरचे डाएट सिक्रेट हॉलीवूड रिपोर्टर यांनी करिना कपूर आणि विकी कौशल यांचा नुकताच एक संवाद आयोजित केला होता. आता हे दोघेही पंजाबी आणि पक्के खवय्यै.. त्यामुळे वेगवेगळ्या पदार्थांवर त्यांची चर्चा रंगली होती. यात बोलताना दोघांच्या आवडीचा पदार्थ कोणता अशी चर्चा झाली.
किती उपाय केले तरी मोगरा काही फुलत नाही? मातीत मिसळा ‘हे’ खास टॉनिक-पावसाळ्यातही येईल बहर
यामध्ये विकीने सांगितलं की बिर्याणी हा त्यांचा ऑल टाईम फेव्हरेट पदार्थ असून डाएट असलं तरी तो बिर्याणी खाणं थांबवू शकत नाही. यानंतर करिना म्हणाली की लोणी आणि बटाट्याचे पराठे हा तिचा अतिशय आवडीचा पदार्थ असून दर २ ते ३ दिवसांनी तिला नाश्त्यामध्ये आलू पराठे आणि लोणी हवंच असतं. बटर किंवा लोणी, बटाटा असे पदार्थ खाणं कित्येक जण टाळतात. कारण त्यांना वजन वाढण्याची भीती वाटते. पण करिना तेच दोन पदार्थ नेहमीच मनसोक्त खाते हे ऐकून विकी म्हणाला की 'हम पंजाबीओंपे माखनका कुछ असर शायद होताही नही है..'
त्याचं हे उत्तर ऐकून करिना जाम खुश झाली आणि म्हणाली अगदी खरंय.. आणि हेच मी लोकांना सांगून सांगून थकले आहे. 'टशन' चित्रपटाच्या वेळी जेव्हा तिची झीरो फिगर होती, तेव्हाही तिने नाश्त्यामध्ये आलू पराठा आणि लोणी खाणं सोडलेलं नव्हतं.
करिनाच्या मते तुम्ही दिवसभराचे इतर पदार्थ कमी खा. पण नाश्ता मात्र पोटभर करा. घरचं लोणी असेल तर त्याने वजन वाढत नाही, असंही डॉक्टर सांगतात. कारण त्यामध्ये असणारे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स आरोग्यासाठी पोषक ठरतात. पण ते योग्य प्रमाणात खाणं आणि त्यानंतर व्यायाम करणं, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे.