करीना कपूर ही बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन आणि फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाते. तिची फिगर आणि फिटनेस पाहून ती चक्क दोन मुलांची आई आहे, असे वाटतच नाही. करीना (Kareena Kapoor diet secrets) कायमच तिच्या अभिनयासोबतच, फिटनेस आणि सौंदर्याची योग्य ती काळजी घेते. स्वतःला सदैव फिट, हेल्दी आणि फिगर मेंटेन्ड ठेवण्यासाठी ती आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करते. इतकचं नाही तर ती आहारासोबतच, एक्सरसाईज रुटीन देखील काळजीपूर्वक (Lauki sabji health benefits) फॉलो करते. अनेक महिलांना (Kareena Kapoor Khan loves eating Lauki sabji) तिच्यासारखी फिट फिगर हवी असते, पण त्यासाठी काय करावे हे कळत नाही.
करीना स्वतःला मेंटेन्ड ठेवण्यासाठी एक साधीसोपी गोष्ट फॉलो करते ती म्हणजे दुधीभोपळ्याची भाजी. आपल्यापैकी बऱ्याचजणांना आवडत नसलेली ही भाजी करीना मात्र आवडीने खाते, कारण या भाजीमध्ये अनेक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. तिच्या आवडीच्या भाज्यांमध्ये दुधीभोपळ्याची भाजी खूप खास आहे. कमी कॅलरी, भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वांनी युक्त दुधीभोपळा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून तो शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो. करीना कपूरसारखे आरोग्य आणि फिटनेस मिळवण्यासाठी दुधीभोपळ्याची भाजी कशी फायदेशीर ठरते ते पाहूयात.
साहित्य :-
१. दुधी भोपळा - २ कप (किसलेला)
२. तेल - १ टेबलस्पून
३. कडीपत्ता - ३ ते ५ पाने
४. मेथी दाणे - १/२ टेबलस्पून
५. जिरे - १/२ टेबलस्पून
६. हिरव्या मिरच्या - २ ते ३
७. हिंग - चिमूटभर
८. हळद - १/२ टेबलस्पून
९. मीठ - चवीनुसार
१०. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
नवरात्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात ९ दिवस उपवास, खातात दिवसातून फक्त एकच फळ, ते ही एकदाच...
कृती :-
१. दुधीभोपळा स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्या.
२. किसणीच्या मदतीने दुधीभोपळा बारीक किसून घ्या.
३. आता एका कढईत तेल ओतून ते व्यवस्थित गरम करुन घ्या.
४. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात मेथी दाणे, कडीपत्ता, जिरे, हिरव्या मिरच्या, हळद, हिंग घालून खमंग अशी फोडणी तयार करुन घ्यावी.
५. नंतर या फोडणीत किसून घेतलेला दुधीभोपळा घालावा.
६. सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालूंन भाजी चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावी. भाजी शिजल्यावर वरुन कोथिंबीर भुरभुरवून भाजी खाण्यासाठी सर्व्ह करावी.
गरमागरम पोळी, भाकरी किंवा फुलक्यासोबत ही पौष्टिक भाजी खायला अत्यंत चविष्ट लागते.