कांदा भजी (Onion Pakoda) म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. कांदा भजी विकत सारखी कुरकुरीत होत नाही अशी अनेकांची तक्रार असते कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स पाहूया (How To Make Crispy kanda Bhaji). घरी कांद्याची भजी केली तर पीठ व्यवस्थित लागत नाही, कुरकुरीत होत नाही, तेलकट होतात अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. पण काही ट्रिक्स वापरल्या घरीच विकतसारख्या भजी बनवता येतील. (How To Make Kanda Bhaji)
कांदा भजी करण्याची सोपी रेसिपी
कांदे लांब आणि पातळ चिरून एका मोठ्या भांड्यात घ्या. चिरलेल्या कांद्यावर चवीनुसार मीठ आणि किंचित लिंबाचा रस टाकून चांगले मिसळा. हे मिश्रण १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा. यामुळे कांद्याला नैसर्गिकरित्या पाणी सुटते, ज्यामुळे तुम्हाला वेगळे पाणी घालण्याची गरज पडत नाही.
कांद्याला पाणी सुटल्यावर त्यात बेसन, तांदळाचे पीठ, चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, धणेपूड, ओवा आणि खसखस घाला. हे सर्व मिश्रण पाणी न घालता हलक्या हाताने चांगले मिसळून घ्या. कांद्याच्या ओलसरपणामुळे पीठ आपोआप एकत्र येते आणि पातळ होत नाही. जर पीठ खूपच कोरडे वाटले तर, फक्त १ ते २ चमचे पाणी शिंपडा. मिश्रण घट्टच ठेवा. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा मिसळा.
सकाळी की रात्री, कधी वॉक केल्यानं वजन पटकन कमी होतं? पाहा योग्य वेळ आणि योग्य परिणाम
एका कढईत तेल चांगले गरम करून घ्या. तेल पुरेसे गरम झालेले असावे. तेलात भजी सोडण्यापूर्वी, जर तुम्हाला सोडा घालायचा असेल तर अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घाला आणि लगेच तळा. सोडा घातल्यास भजी अधिक तेल पिऊ शकतात, म्हणून शक्यतो टाळावा.
साडीत बारीक कसं दिसायचं? ८ टिप्स; कर्व्ही फिगर दिसेल, पोट जराही दिसणार नाही-स्लिम दिसाल
भजी तेलात सोडताना, पीठ एकत्र गोळा करून न सोडता, कांद्याचे पाकळे सुटसुटीत राहतील अशा पद्धतीने भजीचे छोटे-छोटे गोळे हाताने तेलात सोडा. ही तिसरी टीप आहे, ज्यामुळे भजी खेकड्यासारखी कुरकुरीत आणि मोकळी होतात. भजी मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तळलेल्या भजी टिशू पेपरवर काढून घ्या, जेणेकरून अतिरिक्त तेल शोषले जाईल.
Web Summary : Craving crispy onion pakodas? This recipe offers tips to make restaurant-quality Kanda Bhaji at home. Learn how to get the perfect texture and avoid oily fritters with simple tricks using easily available ingredients.
Web Summary : कुरकुरी कांदा भजी बनाने की आसान रेसिपी। घर पर रेस्टोरेंट जैसा स्वाद पाएं। यह रेसिपी आपको सही टेक्सचर पाने और तेल से बचने के लिए आसान तरकीबें सिखाती है।