Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > आंबट कैरी आणि झणझणीत लाल मिरच्यांची खमंग चटणी, उन्हाळा स्पेशल चटकदार रेसिपी 

आंबट कैरी आणि झणझणीत लाल मिरच्यांची खमंग चटणी, उन्हाळा स्पेशल चटकदार रेसिपी 

Kairi Chutney Recipe: ताज्या कैऱ्यांचे दिवस आहेत तोपर्यंत ही खमंग चटणी एकदा नक्कीच करून पाहा....(raw mango chutney recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2026 16:30 IST2026-04-09T16:29:40+5:302026-04-09T16:30:52+5:30

Kairi Chutney Recipe: ताज्या कैऱ्यांचे दिवस आहेत तोपर्यंत ही खमंग चटणी एकदा नक्कीच करून पाहा....(raw mango chutney recipe)

kairi chutney recipe, raw mango chutney recipe, how to make raw mango or kairi chutney  | आंबट कैरी आणि झणझणीत लाल मिरच्यांची खमंग चटणी, उन्हाळा स्पेशल चटकदार रेसिपी 

आंबट कैरी आणि झणझणीत लाल मिरच्यांची खमंग चटणी, उन्हाळा स्पेशल चटकदार रेसिपी 

हिरवीगार ताजी कैरी आणि त्या कैरीपासून तयार होणारे वेगवेगळे पदार्थ हे उन्हाळ्यात खवय्यांसाठी मोठं आकर्षण असतं. कैरीच्या वेगवेगळ्या पदार्थांचे तुम्हीही चाहते असाल तर ही रेसिपी एकदा  नक्की ट्राय करून पाहा. रेसिपी अतिशय सोपी असून याला तुम्ही कैरीचा ठेचा किंवा कैरीची चटणी म्हणू शकता. कधीतरी जेवणात भाजी नसेल तर पोळी, भाकरी, पराठ्यासोबत खायला ही चटणी अगदी उत्तम आहे. शिवाय मोजक्याच साहित्यात अगदी झटपट करता येते (how to make raw mango or kairi chutney?). बघा ही एक सोपी पण अतिशय चटपटीत रेसिपी...(kairi chutney recipe)

लाल मिरची आणि हिरव्यागार कैरीची झणझणीत चटणी

 

साहित्य

१ मध्यम आकाराची कैरी

५ ते ६ लाल मिरच्या

प्रार्थना बेहेरेचं ब्यूटी सिक्रेट- तजेलदार त्वचा आणि सुंदर केसांसाठी ती करते फक्त ‘ही’ एक खास गोष्ट

१ लहान आकाराचा कांदा आणि ५ ते ६ लसूण पाकळ्या

थोडीशी कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि जिरे

१ टेबलस्पून गूळ आणि चवीनुसार मीठ

कृती

 

लाल मिरच्या आणि कैरी यांची चटणी किंवा ठेचा करण्यासाठी सगळ्यात आधी तर लाल मिरच्या २ ते ३ तास पाण्यात भिजवून ठेवा. 

यानंतर भिजलेल्या लाल मिरच्या, चिरलेली कैरी मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यामध्येच कांद्याचे काप, लसूण पाकळ्या, थोडासा गूळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

लहान मुलांना ४-४ दिवस शी होत नाही? ‘या’ गोष्टी करा, आयुष्यभरासाठी कॉन्स्टिपेशनचा त्रास टाळा

हे सगळे पदार्थ मिक्सरमधून फिरवून घ्या. अगदी बारीक पेस्ट मात्र करू नका. ठेचा थोडा जाडाभरडाच ठेवा.

यानंतर चटणी एका भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. नंतर वरतून तेलाची खमंग, कडकडीत फोडणी घाला. कैरी चटणी तयार.. 


 

Web Title : खट्टे कच्चे आम और मसालेदार लाल मिर्च की चटनी रेसिपी।

Web Summary : यह झटपट और आसान कच्चे आम की चटनी की रेसिपी लाल मिर्च, प्याज, लहसुन और मसालों का उपयोग करती है। रोटी, भाकरी या पराठे के साथ बिल्कुल सही, यह एक स्वादिष्ट गर्मी का व्यंजन है।

Web Title : Tangy raw mango and spicy red chili chutney recipe.

Web Summary : This quick and easy raw mango chutney recipe uses red chilies, onion, garlic, and spices. Perfect with roti, bhakri, or paratha, it's a flavorful summer delight.