उन्हाळा आता चांगलाच जाणवायला लागलेला आहे. दुपारच्या वेळी तर घराबाहेर पडायलाही नको वाटतं, एवढी उन्हाची तिव्रता वाढलेली आहे. उन्हाळा सुखद करणारे वेगवेगळे पदार्थ, फळंही बाजारात मिळायला लागलेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कैरी.. कैरी पाहिली की एकतर ती कच्ची खावीशी वाटते किंवा मग तिचे वेगवेगळे पदार्थ करून त्यांचा आस्वाद घ्यावा वाटतो.. कैरीच्या वेगवेगळ्या चवदार पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे कैरीचं आंबटगोड वरण किंवा आमटी. हे वरण जर जेवणात असेल तर पोळी आणि वरण कुस्करून खाण्याची मजाच काही वेगळी (how to make kairicha varan?).. म्हणूनच बघा कैरीचं वरण करण्याच्या २ साध्या सोप्या रेसिपी...(Marathi recipe of kairicha varan or amti)
कैरीचं वरण किंवा आमटी करण्याची रेसिपी
१. वरण करण्यासाठी आंबट असणारीच कैरी घ्यावी. त्यानंतर कैरी धुवून घ्या आणि तिचे बारीक तुकडे करून घ्या. आता धुतलेली डाळ शिजविण्यासाठी जेव्हा तुम्ही कुकरमध्ये लावाल तेव्हाच त्यात कैरीच्या बारीक फोडी घालाव्या. थोडी हळद, हिंग, तेल घालून कैरी डाळीसोबतच छान उकडून घ्यावी.
लग्नसराईत गोडधोड खाऊन वजन वाढलं? ४ सोप्या टिप्स- वाढलेलं वजन उतरेल भराभर..
डाळ शिजल्यानंतर कढईमध्ये फोडणी घालावी. डाळ आणि कैरी छान एकजीव करून कढईत घालावी. गरजेनुसार पाणी घालून वरण पातळ करावं. त्यात चवीनुसार तिखट, मीठ, गरम मसाला घालावा. गूळ अवश्य घालावा. त्यानंतर कोथिंबीर घालून छान उकळी येऊ दिली की कैरीचं वरण झालं तयार...
२. कैरीचं वरण करण्याची दुसरी रेसिपी म्हणजे डाळ शिजवून घ्या. कढईमध्ये फोडणी झाली की त्यात कैरीचा किस घालून तो परतून घ्या.
खासदार कंगना रणौतचं पाहा पॉवर ड्रेसिंग! गॉगल, घड्याळ आणि साडी इतकी सुंदर की.. पाहा फोटो..
त्यानंरत त्यात शिजलेली डाळ, गरजेनुसार पाणी, चवीनुसार तिखट, मीठ, गूळ, मसाला, धणेपूड, जिरेपूड, कोथिंबीर असं सगळं घालून छान उकळून घ्यावं. या दोन्ही पद्धतींनी केलेलं वरण चवदारच होतं. यापैकी जी रेसिपी सोपी वाटेल ती ट्राय करून पाहा..
