lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > उपवास आहे म्हणून फक्त फळं खाता, स्मुदी पिता? त्यानं वजन कमी होणार नाहीच उलट..

उपवास आहे म्हणून फक्त फळं खाता, स्मुदी पिता? त्यानं वजन कमी होणार नाहीच उलट..

उपवासाला फळं खाऊन राहिल्याने पचन सुधारत नाही, उलट पित्ताने आरोग्याला धोका वाढतो कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2024 08:00 AM2024-03-29T08:00:00+5:302024-03-29T08:00:02+5:30

उपवासाला फळं खाऊन राहिल्याने पचन सुधारत नाही, उलट पित्ताने आरोग्याला धोका वाढतो कारण..

Just eating fruits, drink smoothie when you are fasting? not losing weight, health problems? | उपवास आहे म्हणून फक्त फळं खाता, स्मुदी पिता? त्यानं वजन कमी होणार नाहीच उलट..

उपवास आहे म्हणून फक्त फळं खाता, स्मुदी पिता? त्यानं वजन कमी होणार नाहीच उलट..

Highlightsहल्ली डाएट वजन कमी करायचं म्हणून अनेकजणी स्मुदी पितात, परिणाम तोच त्यानं पचनाचं तंत्र बिघडतं.

उपवासाच्या दिवशी काही त्रास होत नाही पण उपवासाच्या दुसऱ्या दिवशी मात्र पित्ताने डाेकं दुखतं, मळमळतं. पोट दुखतं. पोट डब्ब होतं, उलट्या होतात किंवा काही खावंसं वाटत नाही. अनेकजण सांगतात की उपवासाचं काही नाही दुसऱ्या दिवशी फार त्रास होतो. त्याचं कारण असं की उपवास करायचा म्हणून आणि पौष्टिक-कमी खायचं म्हणून अनेकजणी केवळ फळं खातात. 

हल्ली डाएट वजन कमी करायचं म्हणून अनेकजणी स्मुदी पितात, परिणाम तोच त्यानं पचनाचं तंत्र बिघडतं. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. राजश्री कुलकर्णी यासंदर्भात अधिक माहिती देतात..

(Image :google)
 

काय बिघडलं उपवासाला फक्त फळं खाल्ली तर?

१. फळांचा रस म्हणजे ज्यूस  पिऊ नये. अनेक फळं भाज्या-एकत्र करुन स्मुदी तर अजिबात पिऊ नये.
२. सुकामेवा घालून फळांच्या स्मुदी पिऊ नयेत.
३. अख्खं फळ खावं, त्यानं पोट साफ होतं. खाल्लेलं पचत. रस काढून चोथा फेकून देऊ नये.
४. ताजी फळे खाल्ल्याने रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात कारण फळांमध्ये अँटी ऑक्सिडंट घटक असतात. म्हणून स्थानिक आणि ताजी फळं खा, महागडी परदेशी फळं नको.

(Image : google)

५. ऋतूप्रमाणेच फळं खावी. वाट्टेल त्या ऋतूत वाट्टेल ती,सिझन नसलेली फळं खाऊ नयेत.
६. दूध आणि फळं मिक्स करुन फ्रूटसॅलड खाऊ नयेत.
७. दही घालून कोशिंबिर करताना अनेक फळं एकत्र करु नये, दही आंबट नको फार.
८. फळंच खाऊन रहायचं बाकी काहीच खायचं नाही असा आहारही योग्य नव्हे.
९. त्यामुळे पित्त वाढू शकते.
१०. फळं आरोग्याला चांगली पण फक्त फळंच खाऊन राहणं हे आरोग्यासाठी चांगलं नाही. 
 

Web Title: Just eating fruits, drink smoothie when you are fasting? not losing weight, health problems?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.