Join us

तांदुळाची खिचडी खाऊन कंटाळलात, करा ज्वारीची पौष्टिक चविष्ट खिचडी! रेसिपी सोपी, मस्त मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 15:29 IST

Jowar khichdi Healthy millets khichdi : सध्याच्या मिलेट्स डाएट आणि लो कार्ब डाएटसाठी एकदम उत्तम पर्याय

रोजच्या जेवणात बदल म्हणून तुम्ही बाजरी किंवा ज्वारीची खिचडी आहारात समाविष्ट करू शकता. तांदळाच्या तुलनेत  ज्वारीमध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात. (How to make Jowar And Vegetable Khichdi Recipe) ज्वारीच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात. ज्वारीची भाकरी काहीजण  रोजच्या जेवणात खातात. त्याचप्रमाणे ज्वारीची खिचडीसुद्धा चवीला आणि तब्येतीलाही चांगली असते. (Jowar khichdi Healthy millets khichdi)सध्याच्या मिलेट्स डाएट आणि लो कार्ब डाएटसाठी एकदम उत्तम पर्याय.

१) ज्वारीची खिचडी  बनवण्यासाठी सगळ्यात आधी ज्वारी  धुवून स्वच्छ पाण्यात ५ ते ६ तासांसाठी भिजवून  ठेवा.  नंतर  ४ ते ५ शिट्ट्या  घेऊन ज्वारी शिजवून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात जीरं, मिरची, कढीपत्ता, आणि दोन ते तीन चमचे दाण्याचं कुट घाला. 

१ चमचा मेथी अन् तांदळांचं सिक्रेट; भराभर वाढतील केस, केस गळणंही थांबेल

२) शिजवलेल्या ज्वारीमध्ये मीठ आणि एक लिंबू पिळून घ्या. हे मिश्रण तव्यावर घालून परवून घ्या. एक वाफ काढल्यानंतर गॅस बंद करा. तयार आहे गरमागरम ज्वारीची खिचडी. नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी ही खिचडी ट्राय करू शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स