दही (Curd) हा भारतीय आहारातील एक महत्वपूर्ण पदार्थ आहे. अनेक भाज्यांमध्ये, पराठ्यांमध्ये, भाताच्या रेसिपीजमध्ये दह्याचा समावेश केला जातो. गोकुळाष्टमीला (Janmashtami Special) घरोघरी दह्याचा नैवेद्य दाखवला जातो. अशावेळी बाहेरून दही आणण्यापेक्षा घरच्याघरी तुम्ही दही लावू शकता. (How To Make Curd At Home)
विकतसारखं दही घरच्याघरी लावणं खूपच सोपं आहे. त्यासाठी योग्य पद्धत माहीत असायला हवी. (How to make Curd At Home) दही घट्ट लागत नाही, त्यात पाणी खूपच होतं अशी तक्रार बऱ्याच जणांची असते. उत्तम दही कसं लावायचं ते पाहूया. (Thick Curd Recipe)
दही लावण्यासाठी साहित्य
१) फुल क्रिम दूध- १ लिटर
२) दह्याचं विर्जन - १ ते २ चमचे
३) माती किंवा स्टीलचं भांड- झाकण असलेलं.
४) सुती कापड-१
५) एक चिमुटभर दूध पावडर
दूध फुल क्रिम असावं
जाड साय असलेलं दही लावण्यासाठी फुल क्रिम दुधाचा वापर करा. दूध मंद आचेवर गरम करा. उकळ आल्यानंतर १५ मिनिटं व्यवस्थित गरम करून गॅस बंद करा. मंद आचेवर दूध थोडं घट्ट होतं. या स्टेपनं दूधाचं वॉटर कंटेट कमी होते आणि मलई जास्त बनते.
दूध थंड करून घ्या
दूध हलकं कोमट करा. नंतर एक युनिक ट्रिक वापरावी लागेल. दुधात १ चिमूटभर दूध पावडर मिसळा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. यामुळे दही मलईदार बनेल.
विर्जण घालणं
दुधात १ ते २ चमचे ताजं आणि घट्ट दह्याचं विर्जण घाला. हलक्या हातानं किंवा चमच्यानं व्यवस्थित ढवळून घ्या.
कोणत्या जागी ठेवता ते महत्वाचं
दही लावण्यासाठी मातीच्या किंवा मोठ्या स्टिलच्या भांड्याचा वापर करा. भांडं सुती कापडानं लपटून गरम ठिकाणी ठेवा.
दही सेट झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा
जेव्हा दही व्यवस्थित सेट होईल तेव्हा १ तासासाठी फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे दह्याला मलाईदार टेक्सचर येईल आणि घट्ट होईल.