Join us

गुळाचा केक रेसिपी : डाएट आणि गोड दोन्हीचा समतोल राखायचा आहे? मग खा हा हेल्दी केक, साखर-मैदा काही नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2025 15:32 IST

Jaggery Cake Recipe: maintain a balance between diet and sweet food, healthy cake, no sugar or flour : गुळाचा चविष्ट केक नक्की करुन पाहा. एकदम सोपी रेसिपी. तसेच डाएट करणाऱ्यासाठीही मस्तच.

केक तर आवडतो मात्र केकेमध्ये प्रचंड कॅलरिज असतात. म्हणून वाढदिवसालाही केक खाणे अनेक जण टाळतात. मात्र हा केक पोटभर खा. कारण यात ना साखर आहे आणि मैदाही नाही. (Jaggery Cake Recipe: maintain a balance between diet and sweet food, healthy cake, no sugar or flour )गूळ आणि कणिक घालूनही चविष्ट, मस्त केक करता येतो.  परक अजिबात कळत नाही. तसेच छान मऊही होतो. त्यामुळे डाएट आणि गोड खाण्याची इच्छा दोन्ही जपण्यासाठी ही रेसिपी नक्की करुन पाहा.  

साहित्य तूप, गूळ, दही, बेकींग सोडा, दूध, कणिक, सुकामेवा , बेकींग पावडर

कृती१. एका मिक्सरच्या भांड्यात किसलेला गूळ घ्यायचा. गूळाची पावडर मिळते. जर ती पावडर मिळाली तर आणखी उत्तम. मिक्सरच्या भांड्यात गुळासोबत दही घ्यायचे. दोन चमचे दही पुरेसे आहे. तसेच थोडे तूप घ्यायचे. दूध घालायचे आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचे. 

२. एका पातेल्यात कणिक चाळून घ्यायचे. त्यात चमचाभर बेकींग सोडा घालायचा. तसेच त्यात थोडी बेकींग पावडर घालायची. त्यात तयार केलेली गूळाची पेस्ट घालायची. ढवळायचे. मग त्यात थोडे दूध घालायचे आणि ढवळत राहायचे. छान मध्यम पातळ असे मिश्रण तयार करायचे. त्यात थोडा सुकामेवा घालायचा. तूप घालायचे. थोडा वेळासाठी मिश्रण सेट करत ठेवायचे. 

३. थोड्या वेळाने मिश्रण छान फुलेले पंधरा ते वीस मिनिटांसाठी मिश्रण झाकून ठेवायचे. नंतर फेटायचे. फेटून मस्त एकजीव आणि मऊ करायचे. त्यात गरज असेल तर अजून थोडे दूध घालायचे. गरज नसेल तर पाणी दूध काहीही घालू नका. 

४. गॅसवर कढई तापत ठेवायची. त्यात भरपूर मीठ घालायचे. मीठात ताटली उलटी ठेवायची किंवा कुकरचा स्टॅण्ड ठेवायचा. एका गोलाकार भांड्याला तूप लावायचे. तूप वितळवायचे आणि मग लावायचे. त्यावर तयार केलेले मिश्रण ओतायचे. आपटून जरा सेट करायचे.  मीठ जरा गरम झाल्यावर त्यात ते गोलाकार भांडे ठेवायचे. वरतून झाकायचे. गॅस मंदच ठेवायचा. अगदी छान मंद आचेवर केक करायचा. हळूहळू छान फुलेल. मग सुरीने तपायचा. जर सुरीला चिकटत नसेल तर मस्त केक तयार आहे. किमान पंचवीस मिनिटे तरी लागतात. कढई जास्त पातळ घ्यायची नाही.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स