Join us

मस्त मुसळधार पावसात करा पौष्टिक आणि चमचमीत फणसाच्या आठळ्या फ्राय- पारंपरिक टेस्टी पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2025 14:11 IST

Jackefruit Seed Fry : Fansachya Aathlya Fry : How To Make Jackefruit Seed Fry : फणसाच्या आठळ्या फ्राय, चहा किंवा जेवणासोबत तोंडी लावायला म्हणून खाण्यास बेस्ट पदार्थ...

'फणस' हा महाराष्ट्रातील लोकप्रिय व पारंपरिक फळांपैकी एक आहे. आपल्याकडे फणस मोठ्या आवडीने खाल्ला जातो. फणस वर्षभरातून एकदाच मिळत असल्याने सगळेच फणसाच्या गऱ्यांवर (Jackefruit Seed Fry) ताव मारून खातात. फणसाचे गरे खाल्ल्यानंतर त्याच्या बिया म्हणजेच आठळ्या काहीजण (Fansachya Aathlya Fry) फेकून देतात. परंतु फणसाच्या गऱ्यांसोबतच बियांमध्ये देखील तितकाच पौष्टिकपणा असतो. यासाठीच, फणसाच्या बिया फेकून न देता त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाणे देखील आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरते(How To Make Jackefruit Seed Fry).

फणसाच्या बिया या नुसत्या मीठ लावून उकडवून खाल्ल्या तरी फारच चविष्ट लागतात. याचबरोबर, आठळ्यांच्या वेगवेगळ्या पदार्थांपैकी अतिशय चविष्ट आणि मसालेदार पदार्थ म्हणजे 'फणसाच्या आठळ्या फ्राय'. या फणसाच्या आठळ्यांना मीठ - मसाले लावून कुरकुरीत तळून घेतल्या की त्या खूपच रुचकर लागतात आणि चहा किंवा जेवणासोबत तोंडी लावायला म्हणून खाण्यास बेस्ट पदार्थ आहे. फणसाच्या आठळ्या फ्राय करण्याची साधीसोपी रेसिपी पाहूयात.   

साहित्य :- 

१. फणसाच्या बिया - १ कप २. मीठ - चवीनुसार ३. पाणी - गरजेनुसार ४. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून ५. हळद - १/२ टेबलस्पून ६. गरम मसाला - १ टेबलस्पून ७. धणेपूड - १ टेबलस्पून ८. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून ९. कडीपत्ता पाने  - ६ ते ७ पाने १०. बेसन - १ टेबलस्पून ११. तांदुळाचे पीठ - १ टेबलस्पून १२. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)१३. तेल - गरजेनुसार

घरात कोणतीच भाजी नाही? मग करा राजस्थानी फेमस 'पापड की सब्जी' - अस्सल झणझणीत पारंपरिक चव...

कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...

कृती :- 

१. सगळ्यातआधी फणसाच्या आठळ्या खलबत्त्याच्या मदतीने हलकेच ठेचून घ्याव्यात. २. आता कुकरमध्ये थोडे पाणी व चवीनुसार मीठ घालूंन त्यात या आठळ्या घालाव्यात. कुकरमध्ये एक शिट्टी काढून या आठळ्या उकडवून घ्याव्यात. ३. उकडलेल्या बिया एका बाऊलमध्ये काढून त्याची सालं काढून घ्यावीत. त्यानंतर यात मीठ, लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धणेपूड, आलं - लसूण पेस्ट, कडीपत्त्याची पाने, बेसन, तांदुळाचे पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर असे सगळे जिन्नस एकत्रित घालून घ्यावे. हे सगळे साहित्य एकजीव करून फणसाच्या आठळ्यांना लावून घ्यावे. ४. आता एका मोठ्या पॅनमध्ये तेल घेऊन त्यात या मॅरीनेट करून घेतलेल्या फणसाच्या बिया तेलात शॅलो फ्राय करून घ्याव्यात. ५. तेलात या फणसाच्या आठळ्या ५ ते १० मिनिटे फ्राय करून घ्याव्यात.    

फणस आठळ्या फ्राय खाण्यासाठी तयार आहे. मुसळदार पडणाऱ्या पावसात गरमागरम चमचमीत आठळ्या फ्राय खाण्याचा आनंद लुटा.

टॅग्स :अन्नपाककृतीफळे