घरी केलेले पदार्थ नेहमीच सुरक्षित, साधे आणि मनाला समाधान देणारे असतात. अशा घरगुती प्रयोगांमध्ये मिल्क पावडरचे चॉकलेट हा आजकालचा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार मानला जातो. (It's very easy to make delicious chocolate at home using milk powder - make it in just five minutes, it's better than buying it!!)लहान मुलांना आवडेल असे काहीतरी पटकन करायचे, त्यात कृत्रिम रंग, प्रिझर्व्हेटिव्ह किंवा जास्त साखर नको या सगळ्याचा आदर्श पर्याय म्हणजे घरचे पदार्थ. चॉकलेट घरी करणे अगदी सोपे असते. एकदा विकतचे खाण्यापेक्षा असे घरी करुन पाहा. फक्त कोको नाही तर पांढरे मिल्क चॉकलेटही करता येते.
मिल्क पावडरपासून बनवलेले चॉकलेट म्हणजे मऊ, क्रीमी आणि सौम्य गोड चवीचा मस्त प्रकार. बाजारातील चॉकलेट्सच्या तुलनेत हे हलके आणि पोटाला फारसे जड न पडणारे असते. त्याचे टेक्श्चरही मुलांना खूप आवडते. तोंडात टाकताच लगेच विरघळणारा हा पदार्थ नक्कीच एकदा नक्की करुन पाहा.
साहित्य पिठीसाखर, मिल्क पावडर, बटर
कृती १. एका पातेल्यात बटर घ्यायचे. बटर भरपूर नको योग्य प्रमाणात घ्यायचे. वाटीभर मिल्क पावडर घेत असाल तर पाव वाटी बटर वापरा. बटर छान गरम झाल्यावर त्यात अर्धी वाटी पिठीसाखर घालायची. तसेच वाटीभर मिल्क पावडर घालायची. व्यवस्थित ढवळायचे आणि सगळे पदार्थ एकजीव होऊ द्यायचे.
२. त्यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची. सतत ढवळायचे. जरा मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करायचा. एका चॉकलेट मोल्ड मध्ये तयार मिश्रण ओतायचे. छान पसरवून घ्यायचे. आणि सेट करत ठेवायचे. फ्रिजला ठेवायचे. चार ते पाच तासात मस्त चॉकलेट तयार होते.
Web Summary : Making chocolate at home with milk powder is simple, safe, and satisfying. This recipe uses milk powder, butter, and powdered sugar. Melt butter, add sugar and milk powder, stir until smooth, pour into molds, chill, and enjoy homemade chocolate.
Web Summary : मिल्क पाउडर से घर पर चॉकलेट बनाना आसान, सुरक्षित और संतोषजनक है। यह रेसिपी मिल्क पाउडर, बटर और पिसी चीनी का उपयोग करती है। बटर पिघलाएं, चीनी और मिल्क पाउडर मिलाएं, चिकना होने तक हिलाएं, मोल्ड में डालें, ठंडा करें और घर की बनी चॉकलेट का आनंद लें।