Join us
Daily Top 2Weekly Top 5

कारल्याच्या बिया खाणं फायदेशीर असतं की नाही? पाहा कुणी खाव्यात आणि कुणी खाणं टाळाव्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 12:48 IST

Bitter Gourd Seeds : काहींना वाटतं की, कारल्याच्या बिया खाणं नुकसानकारक असतं, तर काही लोक त्यांना आरोग्यासाठी फायदेशीर मानतात. मग खरंच कारल्याच्या बिया खाव्यात का? जाणून घेऊया यामागचं सत्य.

Bitter Gourd Seeds : कारल्याची भाजी समोर आली की, खाण्याआधीच अनेकांच तोंड कडू होतं. पण कारलं चवीला कडू असलं तरी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. डायबिटीसपासून पचनाच्या समस्यांपर्यंत अनेक कारणांसाठी लोक कारल्याचा आहारात समावेश करतात. मात्र कारलं चिरताना बहुतांश लोक त्याच्या बिया काढून टाकतात. काहींना वाटतं की, कारल्याच्या बिया खाणं नुकसानकारक असतं, तर काही लोक त्यांना आरोग्यासाठी फायदेशीर मानतात. मग खरंच कारल्याच्या बिया खाव्यात का? जाणून घेऊया यामागचं सत्य.

कारल्याच्या बिया खाणं सुरक्षित आहे?

एक्सपर्ट सांगतात की, मऊ आणि पांढऱ्या रंगाच्या कारल्याच्या बिया मर्यादित प्रमाणात खाता येतात. खासकरून ताज्या आणि कमी पिकलेल्या कारल्यातील बिया मऊ असतात आणि त्या भाजीसोबत शिजवून खाणं सुरक्षित मानल्या जातात. या बियांमध्ये फायबर आणि काही महत्त्वाचे पोषक घटकही असतात.

जास्त पिकलेल्या बियांपासून सावध राहा

कारलं खूप पिकल्यावर त्याच्या बिया लालसर आणि कडक होतात. अशा बिया खाणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्या पचायला जड ठरू शकतात आणि काही लोकांना पोटदुखी, गॅस किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.

कारल्याच्या बियांतील पोषक घटक

कारल्याच्या बियांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅटी अ‍ॅसिड्स आढळतात. त्यामुळे काही लोक त्यांना आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.

फायबर पचन सुधारण्यास मदत करू शकते

जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत होते

काही संशोधनांनुसार सूज कमी करण्यास मदत होऊ शकते

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात

मात्र या विषयावर अजून अधिक संशोधनाची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी?

लहान मुले, गर्भवती महिला आणि पचन कमजोर असलेल्या लोकांनी कारल्याच्या बिया काळजीपूर्वक खाव्यात. जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटदुखी, गॅस, जुलाब अशा समस्या होऊ शकतात. विशेषतः कडक आणि लालसर बिया असल्यास त्या काढून टाकणे चांगले मानले जाते.

लोक सर्वात मोठी चूक काय करतात?

अनेक लोक कारल्याच्या सर्व बिया न पाहताच फेकून देतात, तर काही लोक सर्व बिया आरोग्यदायी समजून खातात. खरं तर बियांची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही महत्त्वाचे असतात. जर बिया पांढऱ्या, मऊ आणि लहान असतील तर त्या मर्यादित प्रमाणात खाल्ल्या जाऊ शकतात. पण लाल, कडक किंवा जास्त पिकलेल्या बिया काढून टाकणेच योग्य ठरते.

English
हिंदी सारांश
Web Title : Bitter gourd seeds: Benefits, who should eat, and who should avoid?

Web Summary : Bitter gourd seeds can be eaten if soft and white. Avoid red, hard seeds. They contain fiber and antioxidants, aiding digestion and blood sugar. Children, pregnant women, and those with weak digestion should be cautious. Moderation is key.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य