Lokmat Sakhi >Food > गव्हाच्या पिठात मिसळा १ खास पीठ; शुगरही वाढणार नाही आणि वजनही होईल कमी आणि..

गव्हाच्या पिठात मिसळा १ खास पीठ; शुगरही वाढणार नाही आणि वजनही होईल कमी आणि..

Is it a good idea to add besan to your chapatis for health benefits? : मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी पीठ मळताना ही एक गोष्ट पिठात मिसळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2024 01:55 PM2024-06-11T13:55:07+5:302024-06-11T13:56:24+5:30

Is it a good idea to add besan to your chapatis for health benefits? : मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी पीठ मळताना ही एक गोष्ट पिठात मिसळा

Is it a good idea to add besan to your chapatis for health benefits? | गव्हाच्या पिठात मिसळा १ खास पीठ; शुगरही वाढणार नाही आणि वजनही होईल कमी आणि..

गव्हाच्या पिठात मिसळा १ खास पीठ; शुगरही वाढणार नाही आणि वजनही होईल कमी आणि..

आजकालच्या बिघडलेल्या जीवनशैलीचा फटका कमी वयात लोकांना बसत आहे (Chapati for Health). गंभीर आजारांचा धोका वाढत आहे, ज्यात लठ्ठपणा, मधुमेह, कॅन्सर, यासह विविध आजारांचा समावेश आहे (Health Benefits). आजकाल कमी वयात लोकांना डायबिटिज होत आहे (Diabetes). रक्तातील साखरेवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास, शरीरातील अनेक प्रमुख अवयवांचे नुकसान होऊ शकते. शिवाय मधुमेह देखील होऊ शकतो.

केवळ औषधे, सकस आहार आणि जीवनशैलीतील बदलांनीच यावर नियंत्रण ठेवता येते. डायबिटिक रुग्णांनी आपल्या आहारात प्रोटीन, फायबर व आवश्यक पोषक तत्वे समाविष्ट करायला हवीत. मधुमेहग्रस्त रुग्ण जास्त प्रमाणात गव्हाच्या पोळ्या खाणं टाळतात. पण आपण त्यात एक पदार्थ मिसळून पौष्टीक गव्हाच्या पोळ्या मधुमेहग्रस्त रुग्णांना देऊ शकता(Is it a good idea to add besan to your chapatis for health benefits?).

गव्हाच्या पिठात मिसळा बेसन

द हेल्थ साईट. कॉमच्या मते, जर आपण मधुमेहग्रस्त रुग्ण असाल तर, गव्हाच्या पिठाच्या पोळ्या करताना त्यात आपण बेसन घालू शकता. बेसन हे ग्लुटेन मुक्त असते. गव्हाच्या पिठात बेसन घालून पोळ्या केल्याने त्यात अधिक पौष्टीक होतात. या पोळ्या खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याचे नियमित सेवन केल्याने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील.

सोनाक्षी सिन्हाचं लग्न, लेकीने लग्न ठरवलं पण शत्रुघ्न सिन्हा म्हणाले., 'आजकालची मुलं आई-वडिलांची परवानगी...'

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी बेसन कसे फायदेशीर आहे?

मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी बेसन खूप फायदेशीर आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स उत्तम आहे. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, जे रक्तातील साखर तसेच कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. मुख्य म्हणजे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

रुसलेल्या बायकोचा राग कसा कमी करायचा? ६ गोष्टी करा, बायकोही होईल खुश

गव्हाच्या पिठाची पोळी कशी करावी?

गव्हाच्या पिठात एक चतुर्थांश बेसन मिसळून चांगले मळून घ्या. यानंतर, हे पीठ झाकून ठेवा. ३० मिनिटानंतर त्याच्या पोळ्या लाटून शेकून घ्या. 

Web Title: Is it a good idea to add besan to your chapatis for health benefits?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.