Hot tea helps regulate body temperature : उन्हाळा सुरू झाल्यावर लोक एसी, कुलर किंवा फॅनच्या हवेत अधिक राहणं पसंत करतात. त्याचप्रमाणे थंडाव्यासाठी किंवा शरीरात शरीरात जाणवणारी उष्णता कमी करण्यासाठी वेगवेगळे थंड ड्रिंक्स पितात. लस्सी, लिंबू पाणी, कोल्ड्रिंक्स, ताक असे वेगवेगळे ड्रिंक्स घेतात. पण आपण हेही पाहिलं असेल की, बरेच लोक उन्हाळ्यात इतकी उष्णता असूनही चहा पिण्याचा सल्ला देतात. ग्रामीण भागात आजही उन्हाळ्यात चहा पिण्याला महत्व देतात. चहाने प्यायल्याने शरीर थंड राहतं असं ते सांगतात. आता बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की, उन्हाळ्यात आधीच इतकं गरम होतं मग चहाने शरीराचं तापमान वाढणार नाही का? गरम चहाने शरीर थंड कसं होईल? तर याचंच रहस्य आम्ही उलगडणार आहोत.
सायन्स काय सांगतं?
'जर्नल ऑफ फिजिओलॉजिकल सायन्सेस'मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, जेव्हा आपण एखादं गरम पेय घेतो, तेव्हा आपल्या शरीराचं आतील तापमान थोडं वाढतं. इथेच शरीराची कूलिंग सिस्टीम आपलं काम सुरू करते. शरीरात गरम पेय गेल्यावर मेंदूला संकेत मिळतो की, शरीर थंड करण्याची गरज आहे. यावर प्रतिक्रिया म्हणून शरीरातून घाम येणं सुरू होतो. जेव्हा घाम बाहेर निघतो तेव्हाच त्यासोबत शरीरातील उष्णताही बाहेर पडते. परिणाम असा होतो की, शरीर आधीच्या तुलनेत अधिक थंड होतं.
कधी फेल ठरेल ही ट्रिक?
चहा पिऊन स्वत:ला थंड ठेवण्याचा हा वर्षानुवर्षे चालत आलेला फॉर्म्यूला प्रत्येक वेळी बरोबर ठरेल असं नाही. विज्ञानानुसार दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जर आपण दिल्लीत किंवा राजस्थानमध्ये आहात, जिथे घाम लवकर सुकतो. इथे गरमागरम चहा प्याल तर फार फायदा मिळेल. पण जर आपण मुंबई किंवा कोलकातामध्ये राहता, जिथे घाम सुकत नाही आणि चिकट असतो. तेव्हा चहा प्यायल्याने आपल्याला अस्वस्थता जाणवू शकते. तसेच ज्या लोकांना घाम कमी येतो किंवा ज्यांच्या घामाच्या ग्रंथी योग्यपणे काम करत नाहीत, त्यांनी तापमान वाढल्यावर चहा पिणं टाळलं पाहिजे.
चहा पिताना काय काळजी घ्यावी?
चहा पिणं अनेकांची सवय असते, पण चहा पिताना काही गोष्टींची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. जास्त गरम चहा पिऊन नये. कारण याने घसा आणि अन्ननलिकेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे थोडा नॉर्मल झाल्यावर पिऊ शकता. तसेच चहा पावडर जास्त वेळ उकडल्यास चहा टॅनिनचं प्रमाण अधिक वाढतं. जास्त टॅनिन आणि कॅफीनमुळे काही लोकांना अॅसिडिटी किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
Web Summary : Drinking hot tea in summer cools the body through sweating. This works best where sweat evaporates quickly. Avoid if you sweat little or live in humid areas. Drink moderately to prevent discomfort.
Web Summary : गर्मी में गर्म चाय पीने से पसीने के माध्यम से शरीर ठंडा होता है। यह उन जगहों पर सबसे अच्छा काम करता है जहाँ पसीना जल्दी सूख जाता है। यदि आपको पसीना कम आता है या आप आर्द्र क्षेत्रों में रहते हैं तो इससे बचें। परेशानी से बचने के लिए संयम से पिएं।