Lokmat Sakhi >Food > रोज दही खाणं फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या कुणी खाणं टाळलं पाहिजे

रोज दही खाणं फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या कुणी खाणं टाळलं पाहिजे

Curd Eating Tips : काही लोकांना दही खाल्ल्यानं सर्दी-खोकला किंवा पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. त्याशिवाय वेळ, वातावरण आणि शरीराची स्थिती पाहूनच दही खायला हवं. तेव्हाच त्यापासून पूर्ण फायदे मिळतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:38 IST2025-06-18T12:37:17+5:302025-06-18T12:38:47+5:30

Curd Eating Tips : काही लोकांना दही खाल्ल्यानं सर्दी-खोकला किंवा पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. त्याशिवाय वेळ, वातावरण आणि शरीराची स्थिती पाहूनच दही खायला हवं. तेव्हाच त्यापासून पूर्ण फायदे मिळतील.

Is eating curd every day good for you exploring the health benefits and considerations | रोज दही खाणं फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या कुणी खाणं टाळलं पाहिजे

रोज दही खाणं फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या कुणी खाणं टाळलं पाहिजे

Curd Eating Tips : दही भारतीय खाद्य पदार्थातील महत्वाचा भाग आहे. सामान्यपणे सगळेच लोक नेहमीच दही खातात. याचा टेस्ट तर चांगली असतेच, सोबतच आरोग्याला सुद्धा अनेक फायदे मिळतात. दह्यातील प्रोबायोटिक्समुळे पचन सुधारतं, इम्यूनिटी वाढते आणि त्वचा व केसांनाही फायदे मिळतात. दही खाण्याचे अनेक फायदे असले तरी हे गरजेचं नाही की, रोज दही खाणं सगळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. काही लोकांना दही खाल्ल्यानं सर्दी-खोकला किंवा पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. त्याशिवाय वेळ, वातावरण आणि शरीराची स्थिती पाहूनच दही खायला हवं. तेव्हाच त्यापासून पूर्ण फायदे मिळतील.

या लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत की, दही खाण्याचे काय फायदे आहेत, कोणत्या स्थितीत दही खाणं घातक ठरेल, कोणत्या प्रकारचं आणि कोणत्या वेळी दही खाणं योग्य ठरेल. तसेच हेही जाणून घेऊ की, कोणत्या लोकांनी दही खाणं टाळलं पाहिजे. 

रोज दही खाण्याचे फायदे

दह्यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटामिन बी१२ आणि प्रोबायोटिक्स असतात. ज्यामुळे हाडं तर मजबूत होतातच, सोबतच पचन तंत्र चांगलं राहतं. इम्यून सिस्टीम सुधारतं. उन्हाळ्यात दह्यानं शरीर थंड राहतं, ज्यामुळे हीट स्ट्रोक आणि डिहायड्रेशनपासून बचाव होतो.

कुणी दही खाणं टाळावं?

जर तुम्हाला लॅक्टोज इन्टॉलरन्स आहे किंवा जर सर्दी-खोकला होत राहतो, तर दही खाणं टाळलं पाहिजे. खासकरून रात्री किंवा थंडीच्या  दिवसात दही खाल्ल्यानं सर्दी आणि कफाचा धोका वाढतो. अशात दही कमी प्रमाणातच खाल्लं पाहिजे आणि दिवसा खाल्लं पाहिजे.

दही खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

दही नेहमीच दुपारच्या वेळी खाण्याचा सल्ला एक्सपर्ट देतात. दही तुम्ही सलाद, ताक किंवा लस्सीच्या रूपातही पिऊ शकता. रात्री दही खाल्ल्यानं पचनक्रिया स्लो होते आणि सर्दी-खोकला होण्याचा धोका वाढतो. गरम मसाले किंवा आल्यासोबत दही खाणं सुरक्षित मानलं जातं.

दह्यासोबत काय खाऊ नये?

दह्यासोबत मासे, आंबट फळं किंवा आंबट भाज्या खाणं टाळलं पाहिजे. कारण असं केल्यास शरीरात अॅलर्जी किंवा पचनासंबंधी समस्या होऊ शकते. दही खूप जास्त गरम पदार्थ जसे की, पराठा किंवा तंदुरी आयटम्ससोबत खाल्ल्यास याचा प्रभाव कमी होतो. 

वृद्धांसाठी आणि लहान मुलांसाठी दही कसं फायदेशीर

लहान मुलांना दह्यातून कॅल्शिअम आणि प्रोटीन मिळतं. ज्यामुळे त्यांची हाडं आणि दातांची वाढ चांगली होते. वयोवृद्धांचं पचन कमजोर असतं, अशात कमी प्रमाणात दही खाऊन प्रोबायोटिक्सच्या मदतीनं गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. पण वय आणि तब्येत पाहून प्रमाण आणि वेळेची काळजी घ्यावी.

Web Title: Is eating curd every day good for you exploring the health benefits and considerations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.