चॉकलेट म्हणजे आनंदाचा हलका, उबदार स्पर्श. मात्र महिलांसाठी चॉकलेट केवळ चव नव्हे, तर आरोग्यासाठी फायद्याचा ठरु शकतो सांगितले तर विश्वास बसेल का? काही प्रमाणात ठराविक पद्धतीचे चॉकलेट आरोग्यासाठी चांगले असते. विशेषतः साखरविरहित डार्क चॉकलेट. (Is eating chocolate good for women? You will be happy to read this)योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी ते खाल्ले, तर शरीराला ऊर्जा, मनाला शांतता आणि हार्मोन्स संतुलन मिळवून देणारे अनेक फायदे मिळतात.
महिलांच्या शरीरात दर महिन्याला होणाऱ्या बदलांमुळे मूड स्विंग्स, थकवा, पाळीतील वेदना, ताण अशा अनेक स्थिती येत असतात. अशा वेळी डार्क चॉकलेटमधील कोको हा खरा चमत्कार घडवणारा घटक काम करतो. साखर नसलेले किंवा अगदी कमी साखर असलेले डार्क चॉकलेट हे खरेतर एक पौष्टिक सुपरफूड ठरते. यात मॅग्नेशियम, आयर्न, फायटोकेमिकल्स, अँटी ऑक्सिडंट्स, तसेच सेरोटोनिन वाढवणारे संयुगं असतात. ही सर्व तत्त्वे मन प्रसन्न ठेवण्यापासून ते रक्ताभिसरण सुधारण्यापर्यंत अनेक प्रकारे मदत करतात.
डार्क चॉकलेट खाल्यावर पाळीपूर्वी येणारा ताण आणि चिडचिड कमी जाणवते. शरीरातील सूज कमी करण्यासाठी त्यातील अँटी ऑक्सिडंट्स मदत करतात, तर मॅग्नेशियममुळे पोटदुखी काही प्रमाणात कमी होते. रक्ताल्पता असणाऱ्या महिलांसाठी त्यातील लोह हा एक हलका पण उपयुक्त भाग असतो. शिवाय व्यायाम करणाऱ्या महिलांना यातून पटकन ऊर्जा मिळते, मन ताजेतवाने होते आणि क्रेविंग्ज कमी होतात.
डार्क चॉकलेट कधी आणि कसे खावे हेही महत्त्वाचेच. रिकाम्या पोटी गोड चॉकलेट खाल्ले तर रक्तातील साखर चढते, पण ७०% किंवा त्याहून जास्त कोको असलेले आणि साखर अगदी कमी असलेले डार्क चॉकलेट जेवणानंतर थोड्या वेळाने किंवा दुपारी थकवा आल्यावर दोन छोटे तुकडे खाल्ले तर उत्तम. रात्री झोपण्यापूर्वी खाणे टाळावे, कारण यात कॅफीनसारखी ऊर्जा देणारी तत्वे असतात आणि झोपेत अडथळा येऊ शकतो. दिवसाला अंदाजे १५–२५ ग्रॅम म्हणजेच दोन–तीन चौकोन एवढे प्रमाण पुरेसे आणि सुरक्षित मानले जाते.
तथापि सर्व चॉकलेट चांगलेच असते असे नाही. बाजारात मिळणारे दूध चॉकलेट, कॅरॅमल किंवा ट्रफल्ससारख्या प्रकारात साखर जास्त, प्रक्रिया जास्त आणि कोको कमी असते. अशा चॉकलेटमुळे वजन वाढणे, त्वचेवर ब्रेकआउट येणे आणि ऊर्जा कमी जाणवणे हे उलट परिणाम होऊ शकतात. कृत्रिम फ्लेव्हर, हायड्रोजनेटेड फॅट्स किंवा जास्त कॉर्न सिरप असलेले चॉकलेट तर पूर्णपणे टाळावे. सुटे डार्क चॉकलेट विकत आणून त्यात सुकामेवा खजूर घालून घरीच छान चॉकलेट तयार करा आणि ते खा. म्हणजे सगळ्यात उत्तम.
Web Summary : Dark chocolate offers benefits for women's health, including mood enhancement and reduced period pain. It provides energy, balances hormones, and improves circulation. Moderation is key; avoid high-sugar options for optimal health benefits.
Web Summary : डार्क चॉकलेट महिलाओं के स्वास्थ्य के लिए फायदेमंद है, जो मूड को बेहतर बनाता है और मासिक धर्म के दर्द को कम करता है। यह ऊर्जा प्रदान करता है, हार्मोन को संतुलित करता है और रक्त परिसंचरण में सुधार करता है। संयम महत्वपूर्ण है; अच्छे स्वास्थ्य के लिए उच्च चीनी वाले विकल्पों से बचें।