Banana In Winter : चवीला गोड आणि मुलायम केळी एक सुपरफूड आहे. कारण याचे आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. लहान मुलं असोत की घरातील मोठे सगळ्यांनाच केळी आवडतात. त्यामुळे बरेच लोक न विसरता रोज केळी खातात. पण अनेकांना असाही प्रश्न पडतो की, हिवाळ्यात केळी खायच्या की नाहीत? कारण केळी थंड असतात, ज्यामुळे काही होणार तर नाही ना? तर याच प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत. सोबतच केळी खाण्याचे काय काय फायदे होतात हेही बघुया.
केळी खाण्याचे फायदे माहीत नसतात. त्यातल्या त्यात काळे डाग असलेल्या केळीचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. काळे डाग असलेल्या केळी पूर्णपणे पिकलेल्या असतात. केळी पिकल्यानंतर त्यात अॅंटी-ऑक्सीडेंट तत्वांचं प्रमाणही वाढतं. वजन वाढवण्यासाठी केळी महत्वाच्या ठरतात.
केळींमध्ये व्हिटॅमिन, आयर्न, अॅंटी-ऑक्सिडेंट आणि इतरही बरेच आवश्यक पोषक तत्व असतात. केळीमध्ये एफओऐस तत्व आढळतात जे पोटांचे विकार दूर करण्यासाठी उपयोगी ठरतात. पिकलेल्या केळी पोटातील जळजळ आणि अपचन दूर करतात.
1) कॅन्सरशी लढण्यासाठी
काही संशोधकांनुसार ज्या केळींवर काळे डाग असतात ते अधिक आरोग्यदायी असतात. अमेझिंग स्टोरीज अराऊंड द वर्ल्ड नावाच्या शोधपत्रानुसार, द्राक्ष, सफरचंद, कलिंगड, अननस या फळांच्या तुलनेत केळींमध्ये सर्वात जास्त अॅंटी कॅन्सर तत्व असतात.
2) रोकप्रतिकार शक्ती वाढते
कॅन्सरच्या पेशींसोबत लढण्याची क्षमता इतर फळांच्या तुलनेत केळींमध्ये अधिक असते. केळींवर जितके जास्त काळे डाग असतात ते रोगांशी लढण्याची क्षमता अधिक विकसीत करतात.
3) ऊर्जेचा स्त्रोत
केळींमध्ये नैसर्गिक शुगर असते. शारीरिक श्रम केल्यानंतर केळीचं सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते त्यांनी नियमीत केळी खाव्यात.
4) पचनक्रिया राहते चांगली
पिकलेली केळी पटनाला सोपी असते. केळींमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात त्यामुळे ते पचनक्रिया सुधारते.
5) तोंडाची फोडं दूर करण्यासाठी
ज्या लोकांना सतत तोंडाला फोडं येतात त्यांच्यासाठी केळी रामबाण उपाय आहे. तोंडाला फोडे आले असतील तर कच्ची केळी खावीत.
6) तणाव होतो कमी
केळींमध्ये ट्रायप्टोफान नावाचं एमिनो अॅसिड असतं जे तणाव कमी करतं. केळी शरीरातील सेरोटोनिनचं प्रमाण वाढवतात. ज्याने मूड चांगला राहतो.
हिवाळ्यात केळं खाण्याचे तोटे
1. कफ वाढतो
हिवाळ्यात काही लोकांना केळं खाल्ल्यानंतर कफ वाढण्याची समस्या होते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि नाक बंद होऊ शकतं.
2. वजन वाढण्याची शक्यता
केळ्यात कॅलरीज जास्त असल्याने जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकतं.
3. ब्लड शुगर वाढतो
डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी केळं मर्यादित प्रमाणातच खावं, कारण त्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं.
केव्हा टाळावे?
सर्दी, खोकला किंवा पडसा झाल्यास केळं खाणं टाळावं. रात्री केळं खाणं टाळावं, कारण त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
किती खावं?
दिवसात 1 ते 2 केळी पुरेशी आहेत. वजन कमी करायचं असल्यास प्रमाण अजून कमी ठेवा.