भारतीय खाद्यसंस्कृतीत गहू हे अत्यंत महत्त्वाचे धान्य मानले जाते. घरोघरी गव्हाचे पोते भरलेले असतेच. गव्हाचे पीठ सगळीकडे वापरले जाते. महाराष्ट्रात तर रोजच्या आहारात गहू असतातच. (Is Chapati nutritious or Phulka? See what is beneficial for daily diet, what exactly is the difference?, choose healthy food )गव्हाचे पीठ वापरुन अनेकविध पदार्थ तयार करता येतात. याच विविध प्रकारांपैकी एक म्हणजे पोळी. पोळी म्हणा किंवा चपाती म्हणा घरोघरी केली जाते. फक्त पोळीच नाही तर पोळीसारखाच दिसणारा आणखी एक पदार्थ म्हणजे फुलका. गव्हाच्या पीठाचे फुलके केले जातात. या दोन्ही खाद्य प्रकारांना आपल्या रोजच्या आहारात अगदी महत्त्वाची जागा असते. ताटात पोळी असायलाच हवी नाहीतर फुलकाही चालेल. अनेकांना पोळी आणि फुलका सारखाच वाटतो. मात्र दोन्ही प्रकार दिसायला सारखेच वाटले तरी यामध्ये प्रक्रिया, बनवण्याची पद्धत, चव व पौष्टिकता या बाबतीत काही सूक्ष्म पण महत्त्वाचे फरक आहेत.
पोळी तयार करताना, गव्हाच्या पीठात म्हणजेच कणकेत थोडे तेल घातले जाते. मग मीठ घालायचे आणि पाणी घालून मळायचे. पीठ छान मळल्यावर त्याचे गोळे तयार करायचे त्याला लाटून कणीक आणि तेल लावायचे पुन्हा लाटायचे आणि मग तव्यावर पोळी शेकवायची. पोळीची घडी घालण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. काही जण दोन घड्यांची पोळी करतात काही बिनाघडीची करतात. तेलच नाही काही ठिकाणी पोळीला तूपही लावले जाते. पोळी आकाराला मोठी असते.
फुलकाही गव्हाच्या पीठाचाच केला जातो. कणीक भिजवताना मात्र फक्त पाणी वापरायचे. तेल तू काही नाही. मीठही नको. फक्त पाण्याने मळायचे आणि फुलका पोळीपेक्षा आकारालाही लहान असतो. पोळी लाटतात तसेच फुलका लाटायचा आणि तव्यावर एका बाजूने शेकायचा. दुसरी बाजू तव्यावर शेकवता गॅसवरच शेकवायची. गॅसच्या फ्लेममुळे फुलका मस्त फुलतो आणि त्याला वेगळीच चव येते. जी खरंतर फार छान लागते.
फुलक्यात तेल नसते. त्यामुळे फुलका नावा प्रमाणेच हलका - फुलका असतो. पोळीमध्ये तेल असल्याने त्यात कॅलरिजचे प्रमाण फुलक्यापेक्षा जास्त असते. तसेच फुलका पचायला अगदी हलका असतो. मात्र पोळी त्यापेक्षा जड जाते. पचनासाठी फुलका जास्त चांगला. त्यामुळे जर रोज फक्त पोळीच खात असाल तर फुलके खायलाही सुरवात करा. चवीला मस्त असतात आणि पौष्टिकता पोळीपेक्षा जास्त असते.