Join us

फक्त १० मिनिटांत करा तांदुळाची स्वादिष्ट खीर, झटपट आणि सोपी कृती-चव अप्रतिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 16:12 IST

Instant Rice Kheer Recipe in 10 Mins : तांदळाची खीर खाल्ल्यानं तुमच्या तोंडाची चव वाढेल त्याचबरोबर काहीतरी भन्नाट गोड पदार्थ खाल्ल्याचं समाधानही वाटेल.

काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली की नेहमीच पेस्ट्री, चॉकलेट्स, गुलाबजाम असे बाहेरचं पदार्थ खाल्ले जातात. कारण घरी काही बनवायचं म्हटलं की खूपच वेळ जातो. फक्त १ वाटी तांदूळ वापरून तुम्ही रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासह खाण्यासाठी स्वादीष्ट खीर बनवू शकता. (Kheer Recipe, How to Make Rice Kheer) ही खीर करणं एकदम सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागणार नाही. तांदळाची खीर खाल्ल्यानं तुमच्या तोंडाची चव वाढेल त्याचबरोबर काहीतरी भन्नाट गोड पदार्थ खाल्ल्याचं समाधानही वाटेल. (How to make rice Kheer)

कृती

1) १/४ कप गोविंदभोग तांदूळ धुवून ३० मिनिटे भिजत ठेवा.

2) एका जड तळाच्या भांड्यात 1 लिटर फुल फॅट दूध उकळू द्या.

3) एका भांड्यात १/२ कप दूध घ्या. दुधात केशराचे काही तुकडे घालून बाजूला ठेवा.

4)  त्यात भिजवलेले तांदूळ घाला. तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवा. मध्येच ढवळत राहा.तयार केलेले केशर दूध आणि ५-६ चमचे साखर घाला. चांगले मिसळा.

5) खीर घट्ट होईपर्यंत शिजवा आणि ढवळत राहा.

6) 1 टीस्पून वेलची पावडर घाला.

7) ड्रायफ्रुट्स आणि नट्स घाला, चांगले मिसळा.

8) गरम किंवा थंडगार खीर सर्व्ह करा.

खिरीमध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहे. कॅल्शियम दात आणि हिरड्यांचे आजार रोखते आणि जबडे मजबूत आणि निरोगी ठेवते. तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्रोत आहे. तांदळात फायबर असते त्यामुळे ते अतिसाराच्या रुग्णांसाठी चांगले असते.  खीरमध्ये बदामाचा समावेश करण्यात आला आहे. बदामामध्ये ब जीवनसत्त्वे आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतात, जे मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स