Lokmat Sakhi >Food > Traditional Maharashtrian Food : न वाफवता तासाभरात करा पारंपरिक कोथिंबीर वडी! कुरकुरीत - खुसखुशीत वडीची चव न्यारी...

Traditional Maharashtrian Food : न वाफवता तासाभरात करा पारंपरिक कोथिंबीर वडी! कुरकुरीत - खुसखुशीत वडीची चव न्यारी...

Instant Kothimbir Vadi : No Steam Kothimbir Vadi : No Steam Kothimbir Vadi : How To Make No Steam Kothimbir Vadi At Home : Kothimbir Vadi Maharashtrian Snack Recipe : Without Steam Kothimbir Vadi : कोथिंबीर वडी करताना, वाफवण्याची गरजच नाही, घ्या कोथिंबीर वडी करण्याची भन्नाट नवीन रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2025 16:04 IST2025-08-19T15:32:47+5:302025-08-19T16:04:46+5:30

Instant Kothimbir Vadi : No Steam Kothimbir Vadi : No Steam Kothimbir Vadi : How To Make No Steam Kothimbir Vadi At Home : Kothimbir Vadi Maharashtrian Snack Recipe : Without Steam Kothimbir Vadi : कोथिंबीर वडी करताना, वाफवण्याची गरजच नाही, घ्या कोथिंबीर वडी करण्याची भन्नाट नवीन रेसिपी...

Instant Kothimbir Vadi No Steam Kothimbir Vadi No Steam Kothimbir Vadi How To Make No Steam Kothimbir Vadi At Home | Traditional Maharashtrian Food : न वाफवता तासाभरात करा पारंपरिक कोथिंबीर वडी! कुरकुरीत - खुसखुशीत वडीची चव न्यारी...

Traditional Maharashtrian Food : न वाफवता तासाभरात करा पारंपरिक कोथिंबीर वडी! कुरकुरीत - खुसखुशीत वडीची चव न्यारी...

श्रावणातील सणावाराला प्रत्येक घरोघरी वेगवेगळ्या पारंपरिक पदार्थांची रेलचेल असतेच. सणासुदीला किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी आपल्याकडे केल्या जाणाऱ्या खास (Instant Kothimbir Vadi) पदार्थांपैकीच एक लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी. खुसखुशीत, कुरकुरीत वडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला खूप आवडते. हिरवीगार कोथिंबीर, बेसन आणि मसाल्यांचा सुंदर मेळ घालून तयार केलेली ही वडी फक्त चविष्टच नाही तर पौष्टिकही असते( Without Steam Kothimbir Vadi).

कुरकुरीत, खमंग आणि पोटभरीची ही वडी सणावाराला जेवणात रंगत आणतेच. वाफेवर शिजवून नंतर खरपूस तळून घेतलेली ही वडी चवीला अप्रतिम लागते. कोथिंबीर वडी खायला जितकी चविष्ट लागते तितकीच ती करायला देखील  फार मोठा घाट घालावा लागतो. परंतु आपण कोथिंबीर वडी तयार करताना अगदी झटपट आणि फारशी मेहेनत न घेता करायची असल्यास एक सोपी व नवीन पद्धत वापरु शकतो. या नव्या पद्धतीने कोथिंबीर वडी केल्यास आपल्याला वडी वाफवत बसण्याची (How To Make No Steam Kothimbir Vadi At Home) झंझटच भासणार नाही. कोथिंबीर वडी न वाफवता अगदी झटपट इन्स्टंट पद्धतीने करायची असल्यास एक सोपी रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. कोथिंबीर - १ जूडी 
२. बेसन - २ कप 
३. मीठ - चवीनुसार
४. हळद - १/२ टेबलस्पून 
५. ओवा - १/२ टेबलस्पून 
६. पाणी - गरजेनुसार
७. हिरव्या मिरच्या - ४ ते ६ मिरच्या
८. लसूण पाकळ्या - ८ ते १० पाकळ्या
९. तेल - गरजेनुसार
१०. जिरे - १ टेबलस्पून
११. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
१२. धणेपूड - १ टेबलस्पून
१३. पांढरे तीळ - १ टेबलस्पून

Modak Special Recipe : बाप्पाच्या नैवेद्याला करा १० दिवस टिकणारे गव्हाच्या पिठाचे मोदक, चवीला मस्त...


सण - उत्सवाला तळण तर होणारच, कोणतं तेल तळण्यासाठी चांगलं? तेलकट खाऊनही बिघडणार नाही तब्येत...

कृती :-

१. सगळ्यातआधी कोथिंबीरीची पाने निवडून ती पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावी. मग ही स्वच्छ धुतलेली कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावी. 
२. एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ, हळद, ओवा घालावा. मग या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून पीठ पातळसर करून घ्यावे.  
३. मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या घेऊन हिरव्या मिरच्या - लसूण पेस्ट तयार करून घ्यावी. 
४. पॅनमध्ये तेल घेऊन त्यात थोडे जिरे, हळद, लाल मिरची पावडर, धणेपूड, हिरव्या मिरच्या - लसूणाची पेस्ट घालावी. मग यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. हे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करुन व्यवस्थित शिजवून घ्यावे. 

घट्ट कवडी दही लावण्यासाठी मिरचीची एक ट्रिक, अधमुरं दही होईल मस्त! विरजणाचीही गरज नाही..

५. मिश्रण थोडे आटल्यावर त्यात पांढरे तीळ व पातळसर तयार केलेले बेसनाचे बॅटर घालावे. हे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण मंद आचेवर व्यवस्थित घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यावे. 
६. आता एका डिशला थोडे तेल लावून त्यात हे तयार मिश्रण ओतून हाताने दाब देत थापून घ्यावे. मिश्रण गरम असतानाच सुरीचे कापून त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. 
७. तयार वड्या गरम तेलात खरपूस रंग येईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्याव्यात. 

न वाफवता झटपट करता येणाऱ्या कुरकुरीत कोथिंबीर वड्या खाण्यासाठी तयार आहेत.

Web Title: Instant Kothimbir Vadi No Steam Kothimbir Vadi No Steam Kothimbir Vadi How To Make No Steam Kothimbir Vadi At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.