Join us

मिक्सरमध्ये ढोकळा? पाहा १० मिनिटांत कापसाहून हलका-जाळीदार ढोकळा करण्याची रीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2025 14:22 IST

Instant Dhokla At Home : soft and spongy dhokla : dhokla without eno & baking soda : How To Make Dhokla At Home : ढोकळा परफेक्ट करणं हे काही सोपं काम नाही, ही घ्या एक मस्त झटपट रेसिपी...

ढोकळा म्हटलं की तो, पिवळाधम्मक, सॉफ्ट, मऊ लुसलुशीत, जाळीदार असेल तर खायला चविष्ट लागतो. 'ढोकळा' हा खरा गुजरातचा फेमस पदार्थ असला तरी देखील आज घरोघरी ढोकळा (Instant Dhokla At Home) केला जातो. ढोकळा हा मऊ, लुसलुशीत आणि चवीला आंबट गोड व खमंग फोडणीमुळे घरातील सगळ्यांनाच खायला आवडतो. ढोकळा घरी केला तर तो विकतसारखा सॉफ्ट आणि स्पॉंजी होत नाही अशी अनेक गृहिणींची तक्रार असते. ढोकळा (soft and spongy dhokla) घरी करताना तो हमखास बिघडतोच, कधी फुलत नाही तर कधी फारच पचपचीत होतो. यामुळे ढोकळ्याचा बेत अनेकदा फसल्याने अनेकजणी घरी ढोकळा (dhokla without eno & baking soda) करण्याचे कष्टच घेत नाहीत. विशेष म्हणजे, योग्य प्रमाण आणि काही टिप्स फॉलो केल्या तर बाजारात मिळतो तसा मऊ, स्पंजी आणि जाळीदार ढोकळा अगदी घरच्याघरीच तयार करता येतो(How To Make Dhokla At Home).

जेव्हा आपण घरी ढोकळा बनवतो तेव्हा तो विकतसारखा मऊ, लुसलुशीत, आणि जाळीदार झाला तरच तो खाण्यात मजा येते. परंतु काहीवेळा ढोकळा बनवण्याच्या आपल्या चुकीच्या पद्धतीमुळे आपला ढोकळा फसतो किंवा मनासारखा होत नाही. अशावेळी ढोकळा मनासारखा न फुलता फसला तर हिरमोड होतो, आणि सगळ्या मेहेनतीवर पाणी फेरल्यासारखे होते.  मऊ व जाळीदार ढोकळा तयार करण्यासाठी त्याचे बॅटर मिक्सरच्या मदतीने कसे फेटून घ्यावे याची सोपी ट्रिक पाहूयात.   

साहित्य :- 

१. चणा डाळ - १ कप २. पांढरी उडीद डाळ - १/२ कप ३. तांदूळ - १/४ कप ४. पोहे - १ कप ५. पाणी - गरजेनुसार६. मेथी दाणे - १ टेबलस्पून ७. मीठ - १ टेबलस्पून ८. हळद - १/२ टेबलस्पून९. तेल - ३ टेबलस्पून १०. आलं - लसूण - हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून ११. बेकिंग सोडा - १/४ टेबलस्पून १२. लिंबाचा रस - १/२ टेबलस्पून १३. मोहरी - १ टेबलस्पून १४. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ मिरच्या १५. हिंग - १/४ टेबलस्पून १६. कडीपत्ता - ६ ते ८ पाने 

श्रावण स्पेशल : साबुदाण्याची रसमलाई! उपवासाला करा गोडाधोडाचा नवीन पदार्थ, करायलाही सोपा...

श्रावणात नैवैद्याला करा पारंपरिक पंचामृत, पाहा प्रत्येक पदार्थाचं परफेक्ट प्रमाण, चव जणू आजीच्या हातचीच...

कृती :- 

१. एका बाऊलमध्ये चणा डाळ, पांढरी उडीद डाळ, तांदूळ, पोहे, मेथी दाणे एकत्रित घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घेऊन ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत.  २. मग या मिश्रणात पाणी घालून ४ ते ५ तासांसाठी मिश्रण पाण्यांत भिजवून घ्यावे. मिश्रण भिजल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात ओतून बॅटर तयार करून घ्यावे. तयार मिश्रण झाकून आंबवण्यासाठी ६ ते ७ तास तसेच ठेवून द्यावे. 

३. त्यानंतर पीठ फुलून आल्यावर पिठात चवीनुसार मीठ, हळद, तेल, आलं - लसूण - हिरव्या मिरचीची पेस्ट, बेकिंग सोडा, लिंबाचा रस घालून सगळे मिश्रण कालवून एकजीव करुन घ्यावे. ४. त्यानंतर एका भांड्यात हे मिश्रण ओतून २० ते २५ मिनिटे वाफवून घ्यावे. त्यानंतर याचे चौकोनी आकारात तुकडे कापून घ्यावेत. ५. एक भांड्यात तेल घेऊन त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या, हिंग,कडीपत्ता घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. मग ही फोडणी तयार ढोकळ्यावर ओतावी. 

विकतपेक्षाही मऊ, लुसलुशीत आणि खमंग चवीचा असा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. हिरवी चटणी व चिंच - गुळाच्या आंबट - गोड चटणी सोबत ढोकळा खाण्यासाठी सर्व्ह करावा.

टॅग्स :अन्नपाककृतीकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.