चटणी, लोणचं, कोशिंबीर, रायते असे वेगवेगळे पदार्थ जर जेवणात तोंडी लावायला असतील तर जेवण कसं छान रंगत जातं. आता कोशिंबीर करायची म्हटली तर ती काकडीची किंवा टोमॅटोची आपण नेहमीच करतो.. काकडीचं रायतंसुद्धा अनेक जण अगदी आवडीने खातात. पण आता काकडीचा यापेक्षा अगदी वेगळा प्रकार ट्राय करून पाहा.. आणि तो पदार्थ म्हणजे काकडीचं लोणचं (instant cucumber pickle recipe). ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि शिवाय खूप लवकर होणारी (how to make cucumber pickle at home?). एकदम वेगळा आणि चटकदार पदार्थ असल्याने घरातल्या सगळ्यांनाही नक्कीच आवडेल..(cucumber salad recipe)
काकडीचं लोणचं करण्याची रेसिपी
साहित्य
२ मध्यम आकाराच्या काकड्या
१ कप व्हिनेगर
गहू टिकतील वर्षांनुवर्षे- अळ्या, किडे अजिबात होणार नाहीत! धान्य भरताना लक्षात ठेवा ४ टिप्स
१ कप पाणी
२ टेबलस्पून साखर
४ ते ६ लसूण पाकळ्या
१ टीस्पून चिली फ्लेक्स
चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी काकडी स्वच्छ धुवून घ्या आणि तिचे तुम्हाला पाहिजे त्या आकारात काप करून घ्या.
यानंतर व्हिनेगर, मीठ आणि पाणी एका भांड्यात एकत्र करून गरम करून घ्या. या मिश्रणाला हलकीशी उकळी येऊ लागली की गॅस बंद करावा.
शहनाज हुसैन सांगतात तरुण त्वचेचं सिक्रेट- कोलॅजीनयुक्त ४ शाकाहारी पदार्थ खा, सुरकुत्या गायब
आता काकडीचे काप एका काचेच्या बरणीमध्ये भरा. या बरणीमध्ये आपण तयार केलेलं व्हिनेगर, पाणी आणि मिठाचं एकत्रित मिश्रण घाला.
त्यामध्ये आता चिली फ्लेक्स, लसूण पाकळ्यांचे तुकडे, साखर घाला.
आता या बरणीचं झाकण लावून ती ६ ते ७ तासांसाठी फ्रिजमध्ये सेट करायला ठेवून द्या. त्यानंतर हे लोणचं जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा ते फ्रिजमधून बाहेर काढून तुम्ही खाऊ शकता.. या चटपटीत लोणच्याची चव एकदा घेऊन पाहायलाच हवी..