नाश्त्याला नेहमी तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते अशावेळी बाहेरून नाश्त्याचे पदार्थ आणण्यापेक्षा तुम्ही घरीच चविष्ट, चवदार रेसिपीज बनवू शकता. ज्या झटपट करता येतील. नाश्त्याला बेसनाच्या पिठाची इडली करणं खूपच सोपं आहे (How To Make Besan Idali). त्यासाठी तुम्हाला बेसिक साहित्य लागेल. पारंपारीक डाळ, तांदळाची इडली करायची म्हटलं तर खूप मोठी प्रोसेस करावी लागते त्यापेक्षा सोप्या पद्धतीनं तुम्ही ही इडली करू शकता. (Besan Idli Recipe)
बेसनाच्या पिठाची इडली कशी करायची?
एका बाऊलमध्ये दीड कप बेसन घेऊन त्यात दोन मोठे चमचे रवा इडलीला छान जाळी पडण्यासाठी घाला, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, एक चमचा साखर आणि थोडं आलं-मिरचीची पेस्ट एकत्र करा. आता यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मध्यम स्वरूपाचे पीठ तयार करा.पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे.
हे मिश्रण १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर, इडली पात्राला तेलाचा हात लावून ग्रीस करा आणि पिठात एक पाकीट ईनो किंवा अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून त्यावर थोडं पाणी टाका व एकाच दिशेने हलक्या हाताने फेटा. पीठ छान फुगले की लगेच इडली पात्रात ओता आणि मध्यम आचेवर १० ते १२ मिनिटे वाफवून घ्या.
इडल्या वाफवून तयार झाल्यावर त्या थंड होऊ द्या आणि मगच पात्रातून बाहेर काढा. आता त्यावर देण्यासाठी चटपटीत फोडणी तयार करा. एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि तीळ घालून तडतडू द्या.
शेवटी त्यात थोडं पाणी आणि साखर घालून एक उकळी येऊ द्या, ज्यामुळे इडली कोरडी लागणार नाही. ही तयार फोडणी इडल्यांवर सर्व बाजूंनी पसरवा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व ओले खोबरं घालून सर्व्ह करा. मऊ आणि लुसलुशीत बेसन इडली तयार आहे. ही इडली तुम्ही खोबऱ्याची चटणी, सांबार, केचअपसोबतही खाऊ शकता.
Web Summary : Tired of the same breakfast? Make quick, soft besan idlis at home. Mix besan, rava, yogurt, and spices. Steam, then add a mustard seed tempering. Garnish and serve!
Web Summary : एक ही नाश्ते से ऊब गए हैं? घर पर झटपट, मुलायम बेसन की इडली बनाएं। बेसन, रवा, दही और मसाले मिलाएं। भाप लें, फिर राई का तड़का लगाएं। सजाकर परोसें!