Join us

विकेंडला नाश्त्यासाठी करा टम्म फुगलेले, कुरकुरीत अप्पे; ही घ्या झटपट सोपी रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 15:27 IST

Instant Appe Recipe : इडली, डोश्यापेक्षा काहीतरी वेगळं खावसं वाटत असेल तर तुम्ही इंस्टंट अप्पे ट्राय करू शकता.

नाश्त्याला रोज रोज बनवलं तर खायला कंटाळा येतो पण जर पोहे, उपमा,  डोसे याशिवाय काही वेगळ्या डीश ट्राय केल्या तर घरातले सगळेजण पोटभर खातात आणि हॉटेलला न  जाताच काहीतरी वेगळं खाण्याचा आनंद मिळतो.  इडली, डोश्यापेक्षा काहीतरी वेगळं खावसं वाटत असेल तर तुम्ही इंस्टंट अप्पे ट्राय करू शकता. हे अप्पे तयार करण्यासाठी तुम्हाला जास्तवेळ लागणार नाही. (Appe Recipes, South Indian Appe Recipes) हा दक्षिण भारतीय पदार्थ नाश्त्यासाठीच नाही तर  जेवणासाठीही उत्तम ऑपश्न आहे.

अप्पे बनवण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ-  २ कप ( रात्रभर भिजवून ठेवा)

नारळ पाणी- २ कप

साखर - ४ चमचे

नारळ - अर्धी वाटी

पोहे - अर्धी वाटी

मीठ- चवीनुसार

कृती

-सगळ्यात तांदूळ, पोहे, बारीक करून घ्या. नारळाचे अर्धे पाणी बारीक करण्यासाठी वापरा. आंबवलेलं पीठ दुसऱ्या दिवशी वापरू शकता. 8 ते ९ तास पीठ आंबायला ठेवा. 

- दुसऱ्या दिवशी अप्प्याच्या भांड्यात तेल गरम केल्यानंतर त्यात अप्प्याचं सारण भरा.  १० मिनिटं झाकण ठेवून शिजवा. अप्पे फुगल्यानंतर गरमागरम सर्व्ह करा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स