मालपुआ हा भारतातील एक पारंपरिक गोड पदार्थ आहे, जो मुख्यतः सणांच्या वेळी केला जातो. हे तुपात तळलेले गोड पिठाच्या पुऱ्या असतात त्याला पुआ म्हणतात. ते तळून साखरेच्या पाकात भिजवले जातात. (Indian sweets, Authentic Malpua fried in ghee, this dish made with mawa is a succulent feast.)चवीला फार अप्रतिम लागणारा हा पदार्थ अनेक प्रकारे केला जातो. एकदा हा मावा मालपुआ नक्की करुन पाहा.
साहित्यमावा, मैदा, दूध, वेलची पूड, साखर, तूप, पाणी
प्रमाणमावा १५० ग्रॅममैदा २०० ग्रॅम साखर १ कपपाणी १ कप
कृती१. मावा किसून घ्यायचा. माव्यामध्ये अर्धी वाटी गरम दूध ओतायचे. थोडावेळ बाजूला ठेवायचे. मावा दुधात हळूहळू विरघळेल. मग त्यात मैदा घालायचा. थोडी वेलची पूड घालायची आणि हळूहळू दूध घालून छान ढवळायचे. जरा घट्ट असे पीठ तयार करायचे. डोसा बॅटर जसे असते तसे पीठ तयार करायचे. जास्त घट्ट नाही आणि अति पातळही नाही. चमच्याने आरामात ओतता येईल असे तयार करायचे.
२. त्यात एकही गुठळी होणार नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थित ढवळायचे. त्यात पाणी अजिबात घालू नका. दुधातच मिक्स करायचे. तयार झाल्यावर दोन मिनिटे झाकून ठेवायचे. पुन्हा ढवळायचे. गॅसवर तूप गरम करत ठेवा. तेलात तळले तरी चालते. मात्र तुपात तळल्यावर चव जास्त मस्त लागते. तेलात तळल्यावरही छानच होते. खोलगट चमच्याने गरम तुपात मालपुआ सोडायाचा गोलाकार तयार करायचा. मस्त खमंग आणि खुसखुशीत तयार होतो.
३. एका खोलगट पातेल्यात एक कप साखर आणि एक कप पाणी घ्यायचे. गॅसवर गरम करत ठेवायचे आणि एकतारी पाक तयार करायचा. पाक छान दिसावा म्हणून त्यात केशरही घातले जाते. पाक मस्त झाल्यावर त्यात अगदी थोडी वेलची पूड घालायची. पाक मस्त उकळायचा आणि मग गॅस बंद करायचा.
४. तयार मालपुआ गरमागरमच साखरेच्या पाकात बुडवायचा. दोनदा बुडवून काढा आणि बाजूला ठेवा. साखरेच्या पाकात तसाच ठेऊ नका. अति गोड होईल. वरतून आवडत असतील तर काजू, बदाम घालू शकता. किसून घालायचे.