Join us

गोड खायची इच्छा अजिबात मारु नका, दहा मिनिटांत करा हे चॉकलेट पुडींग, नो शुगर- नो बेकींग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 19:12 IST

If you want to eat sweet then go for it, try this healthy pudding , chocolate recipe with healthy twist : चॉकलेट आवडते तर मग ही रेसिपी नक्कीच करा. लहान मुलांसाठी एकदम मस्त.

गोड पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात. मात्र गोड खाणे म्हणजे वजनात वाढ. एवढेच नाही तर विविध आजार त्रास साखरेमुळे होतात. साखर अजिबात खाऊ नये असे सांगितले जाते. (If you want to eat sweet then go for it, try this healthy pudding , chocolate recipe with healthy twist )साखरेत शरीराला गरजेचे असे काही नाही मात्र शरीराला ज्याची गरज नाही असे सारे आहे. त्यामुळे गोड खाणे टाळावे. साखरेचे गोड पदार्थ टाळावेत. साखर न घालताही छान चविष्ट गोड पदार्थ करता येतात. जसे की ही रेसिपी. डाएट करणाऱ्यांसाठी ही रेसिपी एकदम स्पेशल आहे. वजनाची चिंता सोडा आणि बिनधास्त हा पदार्थ खा. 

करायला काही मिनिटे लागतात. काही तास फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर विकतपेक्षा मस्त पुडींग घरीच करता येते. पाहा कसे करायचे. 

साहित्य पनीर, कोको पावडर, डार्क चॉकलेट, गोंद कतिरा, पाणी, खजूर, दूध, कॉफी पावडर, बदाम, दालचिनी पूड

कृती१. एका वाटीत पाणी घ्यायचे. त्यात गोंद कतिरा भिजत घालायचा. दहा ते पंधरा मिनिटांत तो फुलतो. मग बदामचे लहान तुकडे करायचे डार्क चॉकलेटचा एक तुकडा घ्यायचा.   

२. एका मिक्सरच्या भांड्यात पनीर घ्यायचे. २५० ग्रॅम पनीर घेतले तर एक मोठी वाटी पुडींग करता येते. त्यानुसार पनीर घ्या. पनीर नंतर चमचाभर कोको पावडर घ्यायची. जास्त घेऊ नका कडू असते. त्यात डार्क चॉकलेटचा एक मोठा तुकडा घालायचा. त्यात पाच ते सहा खजूर घालायचे. 

 

३. त्यात अगदी थोडी दालचिनी पूड घालायची. तसेच वाटीभर दूध घालायचे आणि थोडे पाणी घालायचे. छान मऊ असे मिश्रण वाटून घ्यायचे. सगळे पदार्थ छान एकजीव होतील याची काळजी घ्यायचे. मऊ आणि मस्त अशी पेस्ट तयार झाल्यावर ती एका काचेच्या वाडग्यात काढून घ्यायची. चमच्याने वरतून सेट करायचे. समान दिसायला लागले की वरतून झाकायचे आणि चार तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवायचे. चार तासांनी तयार होईल. मस्त सेट होईल आणि कमालीचे मऊ होते. तोंडात जाताच छान विरघळते. त्यावर वरतून बदामाचे तुकडे घालायचे.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स