Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > आहारात जर आमसुल असेल तर पित्त राहते आटोक्यात , मळमळ - डोकेदुखी गायब होईल कारण ...

आहारात जर आमसुल असेल तर पित्त राहते आटोक्यात , मळमळ - डोकेदुखी गायब होईल कारण ...

If you have amsul in your diet, nausea and headaches will disappear, summer food : उन्हाळ्यात खा आमसुल. पाहा विविध फायदे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2026 15:52 IST2026-04-05T15:51:59+5:302026-04-05T15:52:50+5:30

If you have amsul in your diet, nausea and headaches will disappear, summer food : उन्हाळ्यात खा आमसुल. पाहा विविध फायदे.

If you have amsul in your diet, nausea and headaches will disappear, summer food | आहारात जर आमसुल असेल तर पित्त राहते आटोक्यात , मळमळ - डोकेदुखी गायब होईल कारण ...

आहारात जर आमसुल असेल तर पित्त राहते आटोक्यात , मळमळ - डोकेदुखी गायब होईल कारण ...

उन्हाळा वाढला की अनेकांना अंगावर पित्त उठणे, त्वचेवर लाल पुरळ येणे, जळजळ होणे किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवू लागतो. शरीरातील उष्णता वाढली की हे त्रास अधिक वाढतात. अशावेळी आहारात थंड गुणधर्म असलेले पदार्थ असणे खूप गरजेचे ठरते. (If you have amsul in your diet, nausea and headaches will disappear, summer food)जसे कोकम पित्त शांत करण्यासाठी ओळखले जाते, तसेच आमसुलही शरीराला थंडावा देणारे आणि पित्त कमी करणारे एक प्रभावी नैसर्गिक घटक आहे.

आमसुल म्हणजे वाळवलेले कोकमच. यामध्ये नैसर्गिक आम्लता असली तरी त्याचा परिणाम शरीरावर थंडावा देणारा असतो. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी आमसुल खूप उपयुक्त ठरते. जे लोक वारंवार अंगावर पित्त येण्याने त्रस्त असतात, त्यांनी आपल्या रोजच्या आहारात आमसुलाचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

उन्हाळ्यात डोकेदुखीचा त्रास अनेकदा शरीरातील उष्णता वाढल्यामुळे होतो. अशावेळी आमसुलाचे पाणी किंवा आमसुल घालून केलेले सरबत घेतल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि डोकेदुखीही कमी होण्यास मदत होते. आमसुल पचनासाठीही हलके असते, त्यामुळे अॅसिडिटी किंवा जडपणा जाणवत नाही.

आमसुलामध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक शीतल गुणधर्म असतात. त्यामुळे ते केवळ पित्त कमी करत नाही, तर त्वचेलाही आराम देते. अंगावर उठणारी खाज, जळजळ किंवा लालसरपणा कमी करण्यासाठी शरीर आतून थंड ठेवणे आवश्यक असते आणि आमसुल यात महत्त्वाची भूमिका बजावते. आमसुलाच्या पाण्याने हातापायावर उठलेले पित्त धुतले तर ते कमी होतं.

दैनंदिन आहारात आमसुलाचा वापर खूप सोप्या पद्धतीने करता येतो. आमटी, कढी किंवा भाजीमध्ये चिंचेऐवजी आमसुल वापरले, तर चवही छान लागते आणि आरोग्यालाही फायदा होतो. तसेच आमसुलाचे सरबत, पाणी किंवा सोलकढीच्या स्वरूपातही ते घेतले जाऊ शकते.
 

 

Web Title : आहार में आमसूल पित्त को नियंत्रित करता है, मितली और सिरदर्द दूर करता है

Web Summary : आमसूल, कोकम की तरह, शरीर को ठंडा करता है और पित्त को कम करता है, जिससे गर्मी से संबंधित समस्याएं जैसे कि चकत्ते और सिरदर्द से राहत मिलती है। इसके शीतलन गुण और एंटीऑक्सिडेंट त्वचा को शांत करते हैं और पाचन में सहायता करते हैं। करी में या समग्र कल्याण के लिए ताज़ा पेय के रूप में उपयोग करें।

Web Title : Amsul in Diet Controls Bile, Eliminates Nausea and Headaches

Web Summary : Amsul, like kokum, cools the body and reduces bile, relieving heat-related issues like rashes and headaches. Its cooling properties and antioxidants soothe skin and aid digestion. Use in curries or as a refreshing drink for overall well-being.