Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > मिक्सरमध्ये करा कुळथाची मालवणी पिठी, गिरणीत जाण्याचीही गरज नाही-अस्सल पारंपरिक चवीची पिठी करा घरीच...

मिक्सरमध्ये करा कुळथाची मालवणी पिठी, गिरणीत जाण्याचीही गरज नाही-अस्सल पारंपरिक चवीची पिठी करा घरीच...

Malvani Kulith Pithi Recipe : authentic malvani kulith pithi : घरच्याघरीच मिक्सरमध्येच तयार करा अस्सल मालवणी चवीची कुळथाची पिठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2026 15:17 IST2026-01-20T14:21:42+5:302026-01-21T15:17:48+5:30

Malvani Kulith Pithi Recipe : authentic malvani kulith pithi : घरच्याघरीच मिक्सरमध्येच तयार करा अस्सल मालवणी चवीची कुळथाची पिठी...

Hulgyache Peeth Kulith pithi recipe authentic malvani kulith pithi | मिक्सरमध्ये करा कुळथाची मालवणी पिठी, गिरणीत जाण्याचीही गरज नाही-अस्सल पारंपरिक चवीची पिठी करा घरीच...

मिक्सरमध्ये करा कुळथाची मालवणी पिठी, गिरणीत जाण्याचीही गरज नाही-अस्सल पारंपरिक चवीची पिठी करा घरीच...

कोकणातली अस्सल मालवणी चव म्हटलं की कुळथाची पिठी डोळ्यासमोर येते. झणझणीत, खमंग आणि मसाल्याचा परफेक्ट सुवास असलेली कुळथाची पिठी म्हणजे सुखचं जणू... कोकणात पाऊस पडत असो वा थंडीची गुलाबी लाट असो, घराघरातून येणारा लसणीच्या फोडणीचा आणि कुळथाच्या पिठीचा सुवास भूक चाळवल्याशिवाय राहत नाही. बाजारात गेलं की अगदी सहज कुळथाची तयार पिठी मिळत असली, तरी घरी तयार केलेल्या पिठीची चव, ताजेपणा आणि सुगंध याला तोड नाही. बाहेरून विकत आणलेल्या पीठापेक्षा, घरच्याघरीच कुळीथ भाजून आणि मिक्सरमध्ये वाटून केलेल्या पिठीची चव काही औरच असते(authentic malvani kulith pithi).

जेव्हा आपण कुळीथ स्वतः भाजतो आणि त्यात पारंपरिक मसाले घालून मिक्सरमध्ये फिरवतो, तेव्हा त्याचा अस्सल गावरान स्वाद टिकून राहतो. ही पारंपरिक मालवणी कुळथाची पिठी आपण घरच्याघरीच मिक्सरमध्ये, कमी वेळात आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. योग्य भाजणी, मसाल्यांचं प्रमाण आणि वाटण्याची पद्धत माहित असेल, तर कुळथासारख्या (Malvani Kulith Pithi Recipe) साध्या कडधान्यालाही अस्सल मालवणी स्वाद मिळतो.

साहित्य :- 

१. अख्खे कुळीथ - १ कप 
२. पांढरी उडीद डाळ - १०० ग्रॅम 
३. चणा डाळ - ५० ग्रॅम 
४. धणे - १/२ कप 
५. बडीशेप - २ टेबलस्पून 
६. काळीमिरी - १ टेबलस्पून 

कांद्याच्या पातीची भाजी नाही भजी करा, कांदाभजींपेक्षा भारी कुरकुरीत भजी-थंडीत तर खायलाच हवीत!


प्रेशर कुकरचा स्फोट होण्यापूर्वी हमखास दिसतात ६ लक्षणं,  ९०% लोक करतात एक चूक...

कृती :- 

१. सगळ्यात आधी अख्खे कुळथाचे दाणे व्यवस्थित निवडून ते गरम पॅनमध्ये ओतून २ ते ३ मिनिटे खमंग सुगंध येईपर्यंत कोरडेच भाजून घ्यावे. भाजून घेतलेले कुळीथ दाणे एका डिशमध्ये काढून घ्यावेत. 
२. त्यानंतर त्याच गरम पॅनमध्ये पांढरी उडीद डाळ, चणा डाळ, धणे, बडीशेप,काळीमिरी प्रत्त्येकी वेगवेगळे भाजून घ्यावेत. 
३. मग कुळथाचे भाजून घेतलेलं दाणे थोडे थंड झाल्यावर मिस्करच्या भांड्यात घालून, मिक्सर चालू - बंद करत हलकेच फिरवून घ्यावा. यामुळे कुळथाच्या दाण्यांवरील सालं निघून जाते. मिक्सरच्या भांड्यातील हे कुळथाचे दाणे काढून त्यातील टरफल वेगळी काढून घ्यावीत. 

प्रेशर कुकरमध्ये करा शिळ्या चपात्या गरम तव्यावर टम्म फुगल्यासारख्या! पाहा एकदम २० चपात्या गरम करण्याची ट्रिक...

४. आता कुळथाच्या दाण्यांची भरड आणि इतर कोरडे भाजून घेतलेलं साहित्य सगळं एकत्रित मिक्स करून घ्यावे. 
५. एकत्रित मिसळून घेतलेले सर्व साहित्य मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घालून त्याची बारीक पावडर होईपर्यंत वाटून घ्यावे. आपण हे मिश्रण घरगंटी किंवा गिरणीत देऊन देखील दळून आणू शकता. कुळथाची पिठी दळून आणल्यानंतर त्यात चमचाभर हळद घालूंन ती मिसळून घ्यावी. तयार झालेली कुळथाची पिठी हवाबंद डब्यांत भरून स्टोअर करून ठेवावी. 

अस्सल मालवणी कुळथाची पिठी कशी तयार करायची ? 

एका बाऊलमध्ये कुळथाचे पीठ घ्या. त्यात थोडे थोडे पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे पातळ द्रावण तयार करून घ्या. गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल घाला. तेल गरम झाले की त्यात भरपूर ठेचलेला लसूण घाला. लसूण लालसर होईपर्यंत परता. लसूण परतल्यावर त्यात हिरव्या मिरच्या आणि हळद टाका. त्यानंतर मालवणी मसाला घालून मंद आचेवर परता. आता तयार केलेले कुळथाच्या पीठाचे द्रावण फोडणीत ओता. सतत ढवळत राहा जेणेकरून पिठी खाली लागणार नाही. पिठीला चवीनुसार मीठ आणि कोकम घाला. पिठीला चांगली उकळी येऊ द्या. शिजताना ही पिठी घट्ट होते, त्यामुळे गरजेनुसार गरम पाणी वाढवू शकता. पिठीला छान दाटपणा आला की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व खवलेल ओलं खोबरं भुरभुरवून घाला.

Web Title : मलवानी कुलिथ पिठी: मिक्सर में घर पर बनाएं प्रामाणिक पाउडर।

Web Summary : मिक्सर का उपयोग करके आसानी से घर पर प्रामाणिक मलवानी कुलिथ पिठी बनाएं। सामग्री को भूनकर और पीसकर पारंपरिक स्वाद बरकरार रहता है। घर के बने ताज़गी का आनंद लें!

Web Title : Malvani Kulith Pithi: Make authentic powder at home in mixer.

Web Summary : Make authentic Malvani Kulith Pithi easily at home using a mixer. Roasting ingredients and grinding them preserves the traditional flavor. Enjoy homemade freshness!