Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कचरा समजून फेकू नका कलिंगडाची साल, त्यापासून वेगवेगळ्या डिश बनवू शकता...पाहा कोणत्या

कचरा समजून फेकू नका कलिंगडाची साल, त्यापासून वेगवेगळ्या डिश बनवू शकता...पाहा कोणत्या

Watermelon Peel Use : अनेकांना हे माहीत नसतं की, कलिंगडाची हीच पांढरी हिरवी जाड साल कचरा अजिबात नाही. कारण याच सालीपासून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 09:32 IST2026-04-11T09:31:24+5:302026-04-11T09:32:28+5:30

Watermelon Peel Use : अनेकांना हे माहीत नसतं की, कलिंगडाची हीच पांढरी हिरवी जाड साल कचरा अजिबात नाही. कारण याच सालीपासून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता.

How to use of watermelon peel to make new dishes | कचरा समजून फेकू नका कलिंगडाची साल, त्यापासून वेगवेगळ्या डिश बनवू शकता...पाहा कोणत्या

कचरा समजून फेकू नका कलिंगडाची साल, त्यापासून वेगवेगळ्या डिश बनवू शकता...पाहा कोणत्या

How To Use Of Watermelon Peel :  उन्हाळा आला रे आला की, बाजारात किंवा रस्त्याने सगळीकडे कलिंगडांचा ढीग लावलेला बघायला मिळतो. लाल, रसदार आणि गोड असे हे कलिंगड उकाड्यात शरीराला मोठा गारवा देण्याचं काम करतात. कलिंगडातून शरीराला भरपूर पाणी मिळतं, सोबतच अनेक पोषक तत्वही मिळतात. याचे फायदे ओळखूनच जास्तीत जास्त लोक या दिवसांमध्ये कलिंगड खातात आणि त्याची साल फेकतात. इथेच मोठी चूक होते. अनेकांना हे माहीत नसतं की, कलिंगडाची हीच पांढरी हिरवी जाड साल कचरा अजिबात नाही. कारण याच सालीपासून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता. जे आपल्याला टेस्टीही लागतील आणि शरीरासाठी हेल्दीही राहतील. चला तर पाहुयात कलिंगडाच्या सालीचा पुन्हा वापर कसा करायचा.

कलिंगडाच्या सालीचा वापर

मुरब्बा

जर कलिंगडाची साल फेकण्याऐवजी त्यापासून काहीतरी वेगळं बनवून खायचं असेल, तर आपण मुरब्बा करू शकता. या सालीचा मुरब्बा टेस्ट असेल आणि तयार व्हायला जास्त वेळही लागणार नाही. सालीचा पांढरा भागाचे तुकडे करून मुरब्ब्यासाठी वापरू शकता.

मसालेदार स्नैक

कलिंगडाच्या सालीचं आपण मसालेदार स्नॅकही बनवू शकता. यासाठी सालीचा पांढऱ्या भागाचे पातळ तुकडे करा आणि त्यावर लिंबाचा रस, चाट मसाला किंवा काळी मिरी पूड टाकून खाऊ शकता. हे खायला खूप टेस्टी लागतील.

लोणचे

जर आपल्याला आंबट किंवा काही चटपटीत खायचं असेल तर यापून लोणचे देखील बनवू शकता. हे खायला फारच टेस्ट लागू शकतात. जेवणाची टेस्ट वाढवण्यासाठी कलिंगडाच्या सालीचे लोणचे फायदेशीर ठरू शकते.

स्मूदी 

कलिंगडाची साल जर फेकायची नसेल तर यापासून आपण स्मूदी सुद्धा बनवू शकता. भिजवलेले चीया सीड्स किंवा सब्जा सीड्स यात घालू शकता. याने स्मूदी टेस्टी आणि हेल्दी होईल.

फ्रूट कँडी
 
थंड फ्रूट कँडी सुद्धा आपण कलिंगडाच्या सालीपासून बनवू शकता. लहान मुलांना ही कँडी नक्कीच आवडेल. ही कँडी खाऊन शरीर आतून गारेगार राहणार.

Web Title : तरबूज के छिलके को न समझें कचरा, बनाएं स्वादिष्ट व्यंजन

Web Summary : तरबूज के छिलके को फेंकें नहीं! मुरब्बा, मसालेदार स्नैक्स, अचार, स्मूदी या फ्रूट कैंडी बनाएं। कचरा कम करें और स्वस्थ, ताज़ा गर्मी के व्यंजनों का आनंद लें।

Web Title : Don't Waste Watermelon Rind! Delicious Dishes You Can Make

Web Summary : Transform watermelon rind into tasty treats! Make murabba, spicy snacks, pickles, smoothies, or fruit candy. Reduce waste and enjoy healthy, refreshing summer dishes.