Join us

कौतुकानं लोणचं घातलं पण महिनाभरात त्यात अळ्या-बुरशी? आजीच्या ३ पारंपरिक टिप्स-लोणचं टिकेल वर्षभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2025 17:41 IST

Follow These 3 Tips To Store Pickles For Long During Monsoon : How to prevent pickles from getting spoiled during monsoon : Monsoon Pickle Storage: 3 Tips To Follow For No Spoilage and Fungus in pickles : How to take care of Pickles during monsoon : इतक्या कष्टाने तयार केलेलं लोणचं बिघडू नये म्हणून योग्य साठवणुकीच्या पारंपरिक टिप्स...

उन्हाळ्यात वाळणाच्या पदार्थांमध्ये हमखास केला जाणारा व सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे लोणचं. मस्त झणझणीत, मसालेदार, चटपटीत लोणचं खायची मज्जा काही औरच असते. जेवणाच्या ताटातील (Follow These 3 Tips To Store Pickles For Long During Monsoon) ती इवलीशी लोणच्याची फोड एक वेगळीच चव आणि आनंद देते. उन्हाळा म्हटल्यावर घरोघरी वेगवेगळ्या प्रकारच वर्षभर पुरेल इतकं लोणचं (How to prevent pickles from getting spoiled during monsoon) केलं जात. एकदाच फार मोठ्या प्रमाणात हे लोणचं करून वर्षभर त्याचा आस्वाद घेतला जातो. ही लोणची तयार करताना फार मेहेनत लागते, एकट्या - दुकट्याचे काम तर मुळीच नाही(How to take care of Pickles during monsoon).

इतके कष्ट घेऊन तयार केलेली लोणची बऱ्याचदा पावसाळ्यात खराब होतात. पावसाळा सुरू झाला की हवेमधल्या आर्द्रतेमुळे लोणची खराब होऊन त्याला बुरशी येऊ लागते. यासाठीच, इतकी मेहेनत घेऊन तयार केलेलं लोणचं पावसाळ्यात खराब होऊ नये यासाठी त्याची साठवण योग्य पद्धतीने करणे देखील तितकेच गरजेचे असते. इतक्या कष्टाने तयार केलेलं लोणचं बिघडू नये म्हणून योग्य साठवणुकीच्या काही पारंपरिक आणि खात्रीशीर उपायांची माहिती घेऊयात. 

पावसाळ्यात लोणचं खराब होऊ नये यासाठी टिप्स... 

उन्हाळ्यात वाळवणाच्या पदार्थांमध्ये मोठ्या हौसेने आणि तितक्याच कष्टाने तयार केलेल लोणचं, अनेकदा पावसाळ्यात खराब होत. लोणच्याला बुरशी येणं, चव बदलणं किंवा लोणचं आंबटसुरा होणं यांसारख्या समस्या टाळण्यासाठी लोणच्याची योग्य साठवणूक करणे अत्यंत गरजेचे असते. cook_happy_home या इंस्टाग्राम अकाउंटवरून लोणचं खराब होऊ नये यासाठी ते स्टोअर करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स सांगितल्या आहेत. 

लोणचं स्टोअर करुन ठेण्यासाठी काचेचं किंवा सिरॅमिकचं भांडं सर्वोत्तम मानलं जातं, शक्यतो प्लॅस्टिक आणि मेटल टाळावं. लोणचं स्टोअर करायचं भांड  पूर्णपणे कोरडं असावं; ओलसरपणा आला की बुरशी लागण्याची शक्यता वाढते. लोणचं खराब न होता वर्षभर चांगलं टिकून राहावं यासाठी, गॅसच्या मध्यम आचेवर एक लोखंडी तवा ठेवावा. तवा चांगला गरम झाल्यावर तव्यावर २ ते ३ टेबलस्पून हिंग घालावं. हिंग थोडं हलकं भाजून घ्याव, हिंग भाजत आलं की त्याचा धूर होतो. या तयार होणाऱ्या धुरावर लोणचं स्टोअर करण्याचं भांडं उलटं ठेवून द्याव, जेणेकरून त्या हिंगाचा तयार होणारा धूर या भांडयाच्या आत जाईल. ३० ते ३५ सेकंद ही हिंगाची वाफ त्या भांड्यात जाऊन द्या. हिंगाच्या ऐवजी आपण कोळशाचा देखील वापर करु शकतो. या उपायामुळे लोणच्याला बुरशी लागून ते खराब होत नाही. 

शिळ्या भाताचा करा मस्त मऊ हलका ढोकळा, फोडणीच्या भातापेक्षा भारी आणि होतो झटपट...

याचबरोबर, लोणचं भांड्यात स्टोअर करून ठेवण्यापूर्वी तळाशी चमचाभर हिंग घालून पसरवून घ्या. मगच त्यात लोणचं भरुन स्टोअर करा यामुळे लोणचं खराब  न होता वर्षभर चांगले टिकून राहते. 

फक्त १५ मिनिटांत करा आप्पेपात्रात मिनी मँगो केक, शाळेच्या डब्यासाठी खास रेसिपी- शाळेची सुरुवात आनंदात...

 सिझन संपला तरी घ्या आंब्याचा आस्वाद! आंब्याच्या फोडी, आमरस स्टोअर करण्याची पद्धत - खा मनसोक्त...

लोणचं साठवताना ते नेहमी हवाबंद बरणीत किंवा बाटलीत स्टोअर करून ठेवावे. लोणचं ठेवलेल्या डब्याचं झाकण नेहमी घट्ट बंद असावं. जर लोणचं हवेच्या संपर्कात आलं तर हवेमुळे बॅक्टेरिया वाढतात आणि लोणचं खराब होण्याची शक्यता वाढते. यासाठी लोणच्याच्या बरणीचे झाकण नेहमी घट्ट लावून ठेवाव. याचबरोबर, लोणच्याच्या बरणीच्या झाकणावर कापड गुंडाळून ठेवावे, जेणेकरून त्यात धूळ, माती, हवा जाणार नाही. यासाठी आपण चक्क गांधी टोपीचा देखील वापर करू शकतो. गांधी टोपीला आतील बाजूने एक छोटे छिद्र करून घ्यावे. या छिद्रांतून एक दोरी आत घालून घ्यावी. दोरी ओढून बटवा जसा उघड - बंद करता येतो त्याचप्रमाणे या गांधी टोपीला देखील करता येते. अशी गांधी टोपी लोणच्याच्या बरणीच्या झाकणावर बांधून घ्यावी. यामुळे लोणच्यावरील कापड काढणे घालणे अगदी सहज शक्य होते.

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स