lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात टोमॅटो लवकर खराब होतात? बघा १ सोपा उपाय- महिनाभर टोमॅटो राहतील फ्रेश

उन्हाळ्यात टोमॅटो लवकर खराब होतात? बघा १ सोपा उपाय- महिनाभर टोमॅटो राहतील फ्रेश

How To Store Tomato For A Month: उन्हाळ्यात टोमॅटो लवकर खराब होतात. शिवाय त्यांचे भावदेखील वाढलेले असतात. म्हणून बघा टोमॅटो जास्तीतजास्त दिवस कसे टिकवून ठेवायचे... (How to keep tomato fresh for a long)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2024 04:36 PM2024-03-14T16:36:41+5:302024-03-14T16:37:37+5:30

How To Store Tomato For A Month: उन्हाळ्यात टोमॅटो लवकर खराब होतात. शिवाय त्यांचे भावदेखील वाढलेले असतात. म्हणून बघा टोमॅटो जास्तीतजास्त दिवस कसे टिकवून ठेवायचे... (How to keep tomato fresh for a long)

How to store tomato for a month, tips and tricks for the storage of tomato, How to keep tomato fresh for a long | उन्हाळ्यात टोमॅटो लवकर खराब होतात? बघा १ सोपा उपाय- महिनाभर टोमॅटो राहतील फ्रेश

उन्हाळ्यात टोमॅटो लवकर खराब होतात? बघा १ सोपा उपाय- महिनाभर टोमॅटो राहतील फ्रेश

Highlights टोमॅटो जास्तीतजास्त दिवस टिकावेत, यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा. (How to keep tomato fresh for a long)

टोमॅटो हा आपल्या स्वयंपाकात जवळपास रोजच लागणारा पदार्थ. कधी त्याची चटणी होते तर कधी वरण. शिवाय त्याला कोणत्याही भाजीत टाकलं तरी तिथे तो स्वत:ला सहज सामावून घेतो. टोमॅटो स्वस्त मिळाले तर आपण ते भरपूर घेऊन ठेवतो. पण नंतर मात्र अगदी ४ ते ५ दिवसांतच ते खराब होऊ लागतात. मऊ पडतात (How to store tomato for a month). असं होऊ नये आणि टोमॅटो जास्तीतजास्त दिवस टिकावेत, यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा. (How to keep tomato fresh for a long)

टोमॅटो जास्तीतजास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी उपाय

 

टोमॅटो जास्तीतजास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी नेमकं काय करायचं, याविषयीच्या २ टिप्स आपण पाहणार आहोत. जर टोमॅटो आपल्याला जास्त दिवस टिकवायचे असतील तर बाजारातून विकत घेताना जास्त पिकलेले टोमॅटो घेऊ नये. ६० ते ७० टक्के पिकलेले टोमॅटो घ्यावेत. 

परीक्षेच्या काळात मुलांना ३ पदार्थ खायला द्या, स्मरणशक्ती- एकाग्रता वाढेल, पेपर सोपे जातील...

सगळ्यात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. ते धुताना त्याच्या देठाकडचा भाग स्वच्छ करा. कारण त्याच भागात जास्त घाण असते आणि त्याच भागातून किड लागण्याची सुरुवात होते. 

टोमॅटो स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ते कोरड्या कपड्याने पुसून घ्या. टोमॅटोमध्ये आणि विशेषत: त्याच्या देठावर आणि देठाच्या आजुबाजुच्या भागात अजिबातच ओलसरपणा राहणार नाही याची काळजी घ्या.

टोमॅटो पुर्णपणे सुकले की एक स्टीलचं मोठं वाडगं किंवा कटोरा घ्या आणि त्यात टोमॅटो रचून ठेवा. अशा पद्धतीने वाडग्यात ठेवलेले टाेमॅटो झाकण न ठेवता फ्रिजच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात ठेवून द्या. २० ते २५ दिवस टोमॅटो अगदी फ्रेश राहतील.

 

टोमॅटो जास्तीतजास्त दिवस टिकवून ठेवण्याच्या दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण व्हाईट व्हिनेगरचा वापर करणार आहोत.

मेथीच्या भाजीच्या देठांची चटपटीत चटणी, एकदा खाऊन पाहाल तर नेहमीच कराल- बघा सोपी रेसिपी

टोमॅटो धुतल्यानंतर जेव्हा ते पुर्णपणे वाळतील, तेव्हा इअर बड घ्या आणि इअर बडच्या साहाय्याने टोमॅटोच्या देठावर व्हिनेगर लावा. यानंतर ५ ते १० मिनिटे टोमॅटो बाहेर राहू द्या आणि त्यानंतर स्टीलच्या डब्यात किंवा भाज्यांसाठी असणाऱ्या पिशव्यांमध्ये ते भरून ठेवा. २५ ते ३० दिवस टोमॅटो अगदी ताजे- फ्रेश राहतील.

 

Web Title: How to store tomato for a month, tips and tricks for the storage of tomato, How to keep tomato fresh for a long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.