Join us

मळून ठेवलेली कणिक किती दिवसात खराब होते? पाहा फ्रिजमध्ये कणिक किती दिवस ठेवणं योग्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2025 13:42 IST

how long does flour stay fresh : how to store roti dough for long time : tips to keep chapati dough fresh : best way to store roti atta in fridge : how to preserve chapati dough overnight : storing wheat dough without spoiling : how to keep roti dough soft and fresh : मळून ठेवलेली कणिक फ्रिजमध्ये किती दिवस चांगली रहाते, ती खराब झाल्याचे कसे ओळखावे यासाठी खास टिप्स...

आपल्यापैकी अनेक गृहिणींना वेळेची बचत करण्यासाठी कणिक मळून फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय असते. यामुळे सकाळच्या घाईगडबडीत चपात्या किंवा पराठे झटपट तयार करणे सोपे जाते. पण, ही मळून ठेवलेली कणिक किती दिवसांपर्यंत चांगली टिकून राहते आणि कधी खराब होते, असा प्रश्न अनेकजणींना पडतो. जर मळून ठेवलेली कणिक (how to preserve chapati dough) योग्य पद्धतीने साठवली नाही, तर ती आंबूस होऊन त्यावर काळे आणि हिरवे बुरशीचे थर जमा होऊ लागतात. तसेच, कणकेचा पोत आणि (storing wheat dough without spoiling) चवही बिघडते. हवामान, साठवणुकीची पद्धत आणि तापमान यावर कणकेचा टिकाऊपणा अवलंबून असतो. मळून ठेवलेली कणिक योग्य प्रकारे स्टोअर न केल्यास कणिक लवकर आंबट होते आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते(how to keep roti dough soft and fresh)

खरंतरं, सकाळच्या सकाळच्या पोळ्यांपासून ते संध्याकाळसाठी पराठे तयार करण्यासाठी कणकेचा वापर केला जातो. परंतु, प्रत्येकवेळी कणिक मळण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध असेलच असे नाही यासाठी आपल्यापैकी अनेकजणी कणिक आधीच जास्तीची मळून ठेवतात. परंतु अशा प्रकारे एकदाच जास्तीची कणिक मळून ती फ्रिजमध्ये स्टोअर करून मग दररोज हवी तशी काढून वापरणे कितपत योग्य आहे. याचबरोबर, याचा आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. आपण मळून ठेवलेली कणिक फ्रिजमध्ये किती दिवसांसाठी सुरक्षित राहते, ती खराब झाल्याचे कसे ओळखावे आणि ती जास्त काळ ताजी कशी ठेवावी, याबद्दल सविस्तर माहिती माहिती पाहूयात..

१. कणिक योग्य पद्धतीने साठवणे का महत्त्वाचे आहे?

वातावरणातील ओलावा आणि उष्णतेमुळे मळून ठेवलेली कणिक खराब होऊ शकते. जर कणिक उघड्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत जास्त काळ ठेवली, तर त्यात बुरशी व कीटक शिरकाव करतात, यासाठीच कणिक नेहमी हवाबंद स्टील किंवा काचेच्या डब्यात आणि थंड व कोरड्या जागी स्टोअर करून ठेवावी. 

२. मळून ठेवलेली कणिक किती दिवसांत खराब होते ?

कणिक योग्य प्रकारे साठवली नाही, तर ती लवकर खराब होते. हवामानानुसार कणिक किती दिवस टिकेल हे ठरते.

साधे गव्हाचे पीठ :- जर तुम्ही ते उघड्यावर ठेवले, तर १ ते २ आठवड्यांत खराब व्हायला सुरुवात होते.

मिक्स पीठ (मैदा + गहू + गव्हातील कोंडा) :- हे पीठ २ ते ३ आठवड्यांपर्यंत ताजे राहू शकते.

उन्हाळा आणि पावसाळा :- या काळात कणकेची शेल्फ लाइफ अजून कमी होते, कारण त्यात ओलावा आणि बॅक्टेरिया वेगाने वाढतात.   

गूळ-ज्वारीचा केक खाऊन तर पाहा, फक्त १५ मिनिटांत करा मुलांसाठी पौष्टिक आणि चविष्ट केक...

३. खराब झालेली कणिक कशी ओळखाल?

फक्त रंग पाहून कणिक खराब झाली आहे की नाही, हे ठरवता येत नाही.

१. कणकेला वेगळाच किंवा आंबट वास येणे.

२. त्यात छोटे कीटक किंवा बुरशी दिसणे.

३. चवीत बदल होणे.

४. कणिक जास्त चिकट किंवा कणकेत गुठळ्या तयार होणे. 

अशाप्रकारचे काही बदल कणकेत दिसल्यास ती लगेच फेकून द्यावी.

४. कणिक जास्त काळ ताजी ठेवण्याचे सोपे उपाय... 

कणिक (पीठ) नेहमी कमी प्रमाणात खरेदी करा, जेणेकरून जुने पीठ लवकर संपेल.

कणकेला कधीही ओल्या हातांनी किंवा भांड्याने स्पर्श करू नका.

उन्हाळ्यात कणिक फ्रिजमध्ये किंवा थंड ठिकाणी स्टोअर करुन ठेवा. 

गव्हाचे पीठ हलके भाजून घेतल्याने देखील ते खराब न होता दीर्घकाळ चांगले टिकून राहते. 

खराब कणकेमुळे होणारे आरोग्याचे नुकसान... 

खराब कणकेपासून तयार केलेल्या पोळ्या किंवा पराठे खाल्ल्यास पोटदुखी, उलटी, जुलाब आणि फूड पॉयझनिंगसारख्या समस्या होऊ शकतात. लहान मुले, वृद्ध आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशा लोकांना याचा जास्त त्रास होऊ शकतो. म्हणूनच, कणकेच्या ताजेपणाकडे दुर्लक्ष करू नये. काहीजणींना  असे वाटते की कणिक मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्याने त्याची शेल्फ लाइफ दुपटीने वाढवता येते. परंतु असे केल्याने कणकेतील ओलावा अजून वाढतो आणि त्यामुळे ती लवकर खराब होऊ शकते.

टॅग्स :अन्नपाककृतीकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.