Lokmat Sakhi >Food > कणीक भिजवून फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर कणीक भिजवायला ‘हे’ पाणी वापरा, काळी पडणार नाही...

कणीक भिजवून फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर कणीक भिजवायला ‘हे’ पाणी वापरा, काळी पडणार नाही...

How to store leftover roti dough in fridge : How to Keep Chapati Dough Fresh For Long : How to store leftover roti dough : How do you store roti dough : कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर, फ्रिजमध्ये पीठ ठेवण्याआधी महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 21:35 IST2025-06-30T21:30:00+5:302025-06-30T21:35:01+5:30

How to store leftover roti dough in fridge : How to Keep Chapati Dough Fresh For Long : How to store leftover roti dough : How do you store roti dough : कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर, फ्रिजमध्ये पीठ ठेवण्याआधी महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा...

How to store leftover roti dough in fridge How to Keep Chapati Dough Fresh For Long How to store leftover roti dough How do you store roti dough | कणीक भिजवून फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर कणीक भिजवायला ‘हे’ पाणी वापरा, काळी पडणार नाही...

कणीक भिजवून फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर कणीक भिजवायला ‘हे’ पाणी वापरा, काळी पडणार नाही...

चपाती आपल्या भारतीय जेवणातला रोज केला जाणारा सगळ्यात मुख्य पदार्थ आहे. काही घरांमध्ये चपाती अगदी दररोज न चुकता केली जाते. काहींना तर जेवणात (How to store leftover roti dough in fridge) चपाती लागतेच, चपाती नसेल तर जेवण अधुरे झाल्यासारखेच वाटते. यासाठी, दररोज प्रत्येक घरी हमखास चपातीसाठी कणीक मळली (How to Keep Chapati Dough Fresh For Long) जाते. परंतु काहीवेळा जास्तीची कणीक फ्रिजमध्ये स्टोअर (How to store leftover roti dough) करून दुसऱ्या दिवशी त्याच्या चपात्या केल्या जातात. परंतु आपल्यापैकी अनेकींना अनुभव आला असेल की, मळून ठेवलेली कणीक फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवली की, त्याला कुबट दुर्गंधी येऊन ती हलकीशी काळी पडते(How do you store roti dough).

फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक चिकट होऊन काळसर पडते त्यामुळे अशा कणकेच्या चपात्या करणं म्हणजे फार कठीण काम. इतकंच नव्हे तर, या कणकेपासून चपात्या केल्यास आरोग्यास धोकादायक ठरु शकते. या कणकेच्या जरी चपात्या केल्या तर त्या वातड किंवा कडक होतात, त्यामुळे अशा चपात्या खायला नकोशा वाटतात. अशावेळी, पैसा, वेळ आणि मेहेनत सर्वच वाया जाते. यासाठी उरलेली कणीक दीर्घकाळ ताजी, सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी ती योग्य पद्धतीने साठवणे अत्यंत गरजेचे असते. उरलेली कणीक काळी न पडता ती दीर्घकाळ ताजी ठेवण्यासाठी कोणते सोपे उपाय करता येतील ते पाहूयात. 

उरलेली कणीक दीर्घकाळ ताजी ठेवण्यासाठी सोपे उपाय.... 

१. जर तुम्ही जास्तीची कणीक मळणार असाल किंवा कणीक भिजवून ते दुसऱ्या दिवशी वापरणार असाल, तर अशावेळी कणीक भिजवताना ते नेहमी थंडगार पाण्याचा वापर करुन भिजवावे. एका मोठ्या भांड्यात बर्फाचे खडे घ्यावेत त्यात पाणी ओतावे, हे पाणी पूर्णपणे थंडगार होऊ द्यावे. अशा थंडगार पाण्याने कणीक मळून घ्यावी, अशा पद्धतीने कणीक भिजवल्यास ती काळी पडत नाही तसेच त्याला कुबट दुर्गंधीही येत नाही. 

२. कणीक मळून झाल्यावर ज्या भांड्यात स्टोअर करुन फ्रिजमध्ये ठेवणार आहात, त्या भांड्याला आतून थोडे तेल लावून घ्यावे. तेल लावल्यावर यात कणीक ठेवून झाकण लावावे. शक्यतो एअरटाईट कंटेनरमध्येच भिजवलेली कणीक स्टोअर करावी. 

अस्सल गावरानं चवीचं पौष्टिक शेवग्याच्या शेंगांचं पिठलं! पारंपरिक मराठमोळी झक्कास झटपट रेसिपी...

कढी फुटते-पांचट लागते-बेसनाच्याही गुठळ्या होतात? टाळा ४ चुका, कढी होईल फक्कड...

३. फ्रीजमध्ये कणीक ठेवताना ती हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करुन ठेवा आणि तो डबा पाण्याने भरलेल्या ताटात ठेवून मगच फ्रिजमध्ये ठेवा. पाण्यामुळे कणीक ताजी राहण्यास मदत होते.

४. कणीक कधीच फ्रीजमध्ये उघडी ठेवू नये. यामुळे ती लवकर काळी पडते. फ्रीजमध्ये कणीक ठेवताना नेहमी हवाबंद डब्याचा वापर करा. कणीक उघडी ठेवल्यास फ्रीजचे थंड पाणी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कणीक लवकर कडक होते. यामुळे चपात्या करणे कठीण जाते.

Maharashtrian Alu Vadi Recipe: अस्सल मराठी चवीची पारंपरिक अळूवडी करायची आहे? ‘हे’ घ्या परफेक्ट प्रमाण...

५. रात्री तुम्ही कणीक भिजवून ठेवत असाल तर कणीक भिजवताना पाण्याचा वापर कमी करा. कारण फ्रीजमध्ये ओलाव्यामुळे पीठ सैल होते आणि काळे पडते.

६. फ्रीजमध्ये ठेवलेली कणीक चपाती करण्यासाठी आधी सामान्य तापमानावर येऊ द्या. मगच चपात्या करा. असे केल्यास पोळ्या मऊ होतात. चपात्या करण्याआधी किमान अर्धा तास आधी फ्रिजमधून कणीक बाहेर काढून ठेवा.


Web Title: How to store leftover roti dough in fridge How to Keep Chapati Dough Fresh For Long How to store leftover roti dough How do you store roti dough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.