Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > तिखट हळद जिरे मसाले होणार नाहीत खराब, लागणार नाही जाळं; पाहा ही खास युक्ती

तिखट हळद जिरे मसाले होणार नाहीत खराब, लागणार नाही जाळं; पाहा ही खास युक्ती

Kitchen Tips : किचनमध्येच अशा काही गोष्टी असतात ज्या मसाल्याच्या डब्यात ठेवल्या तर मसाले जास्त काळ टिकतील आणि त्यात कीटकही होणार नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:44 IST2025-08-04T11:01:17+5:302025-08-04T13:44:19+5:30

Kitchen Tips : किचनमध्येच अशा काही गोष्टी असतात ज्या मसाल्याच्या डब्यात ठेवल्या तर मसाले जास्त काळ टिकतील आणि त्यात कीटकही होणार नाहीत.

How to store jeera powder and other spices for a long time | तिखट हळद जिरे मसाले होणार नाहीत खराब, लागणार नाही जाळं; पाहा ही खास युक्ती

तिखट हळद जिरे मसाले होणार नाहीत खराब, लागणार नाही जाळं; पाहा ही खास युक्ती

तिखट

लाल मिरची पावडरची शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी यात एक चमचा मीठ टाकून ठेवा. मिरची पावडरच्या डब्यात मीठ घालून ठेवल्यास पावडर जास्त दिवस फ्रेश राहते. सामान्यपणे भाजी करताना त्यात मीठ आणि टाकलं जातंच. सोबतच मिरची पावडरही टाकली जाते. त्यामुळे यानं काही समस्या होणार नाही.

हळद

हळदीच्या डब्यात अनेकदा कीटक शिरततात. अशात हळदीमध्ये कीटक जाऊ नये म्हणून डब्यात एक तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र ठेवा. या पानानं कीटक हळदीच्या डब्यापासून दूर राहतात. तसेच यानं हळद फ्रेशही राहते.

धणे 

धणे फ्रेश ठेण्यासाठी आणि त्यांचं लाइफ वाढण्यासाठी धणे ड्राय रोस्ट करून ठेवू शकता. असं केल्यास धणे जास्त काळ टिकतात आणि चांगले राहतात.

कडूलिंब

वाळलेली कडूलिंबाची पानं मसाले चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. या पानांमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअर गुण असतात, जे बारीक कीटक दूर ठेवतात आणि मसाले जास्त काळ चांगलेही राहतात.

एअरटाइट डबा

मसाले जास्त काळ चांगले ठेवायचे असतील, फ्रेश ठेवायचे असतील तर डबे नेहमीच एअरटाइट असावेत. डबे जर एअरटाइट असतील तर मसाले लवकर खराब होणार नाही आणि त्यांची शेल्फ लाइफही वाढेल.

Web Title: How to store jeera powder and other spices for a long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.