संकष्टी चतुर्थीचा उपवास अनेक घरांमध्ये केला जातो. घरातले सगळेच जण संकष्टी चतुर्थी करतात. त्यामुळे मग संकष्टीच्या दिवशी अनेक घरांमध्ये सकाळी नाश्त्याचा मेन्यू म्हणजे साबुदाणा खिचडी. कारण ती सगळ्यांना खूप आवडते. पण नेमकं कधीतरी असं हाेतं की आदल्या दिवशी रात्री इतर कामांच्या गडबडीमुळे साबुदाणाच भिजत घालायचं राहून जातं. आता साबुदाणा खिचडी करायची म्हटलं तर साबुदाणा छान मऊसून भिजला गेलाच पाहिजे. म्हणूनच असं कधी तुमच्या बाबतीत झालं तर ऐनवेळी मेन्यू बदलण्याची काहीच गरज नाही ( 2 tips for soaking sago quickly). पुढे सांगितलेल्या काही साध्या सोप्या ट्रिक्स उपयोगात आणल्या तर नक्कीच साबुदाणा अगदी अर्ध्या तासांत छान भिजू शकतो.(how to soak sabudana or sago urgently for making sabudana khichadi?)
अर्ध्या तासात साबुदाणा भिजविण्याचे उपाय
१. पहिला उपाय
जर साबुदाणा तुम्हाला अगदीच झटपट भिजवून पाहिजे असेल तर ही ट्रिक उपयोगी येऊ शकते. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला जेवढा साबुदाणा पाहिजे असेल तो एका मोठ्या पसरट आकाराच्या कढईमध्ये घ्या. ३ ते ४ वेळा तो अगदी स्वच्छ धुवून घ्या.
त्यानंतर सगळा साबुदाणा व्यवस्थित बुडेल एवढं पाणी कढईमध्ये घाला आणि ती कढई गॅसवर गरम करायला ठेवा. पाण्याला एखादा मिनिट चांगलं उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. कढईतलं जास्तीचं पाणी काढून टाका आणि १० मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवून द्या. त्यानंतर साबुदाणा चांगला भिजलेला दिसेल.
२. दुसरा उपाय
जर तुमच्याकडे एखाद्या तासाचा वेळ असेल तर हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी साबुदाणा ३ ते ४ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
ही चाल तुरुतुरु! मॉर्निंग वॉक करुनही वजन कमी होत नसेल तर ‘असं’ ५ पद्धतींनी चाला..
त्यानंतर साबुदाणा भिजेल एवढं पाणी एका पातेल्यात गरम करून घ्या आणि त्या पाण्यात साबुदाणा भिजत घाला. तासाभरात साबुदाणा अगदी चांगला भिजला जाईल.