बऱ्याच घरांमध्ये रोज दही खाल्ले जाते. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसांत दही, ताक असे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. घरी दही लावणं काही विशेष नाही तुम्ही सोप्या पद्धतीनं विकत मिळतं तसं परफेक्ट दही घरीच तयार करू शकता (Pro Tips For Make Curd At Home). पण बऱ्याचजणांना असा अनुभव येतो की दही खूपच आंबट होतं किंवा त्यात पाणीच जास्त राहतं, दही घट्ट होतच नाही. कापता येईल इतकं घट्ट दही बनवणं खूपच सोपं आहे त्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. (How To Make Thick Curd At Home)
नेहमी फुल क्रिम दुधाचा वापर करा
तुम्हाला घट्ट दही हवं असेल तर नेहमीच फुल क्रिम दुधाचा वापर करा. जर तुम्ही पॅकेटचं दही वापरणार असाल तर त्यावर फुल क्रिम दूध असं लिहिलंय की नाही ते पाहून घ्या.
दूध किती उकळवावं? इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या एका ट्रिकनुसार तुम्ही जितकं व्यवस्थित दूध उकळवाल तितकंच घट्ट आणि मलईदार दही लागेल. कारण दूध गरम केल्यानंतर त्याचे टेक्सचर अधिक जाड होते.
नेहमी कोमट दूधच घ्या
दही लावण्याआधी कधीच थंड दूध घेऊ नका किंवा जास्त गरमही घेऊ नका. अन्यथा विरजण व्यवस्थित लागत नाही. दूध नेहमी कोमट असू द्या. ज्यामुळे दही परफेक्ट लागतं.
दुधात १ ते २ चमचे विरजण घाला
दही व्यवस्थित लागण्यासाठी ताज्या दह्याचा वापर करा. जवळपास १ ते २ चमचे विरजण पुरेसं ठरेल. जर तुमच्याकडे ताजं दही नसेल तर २-३ दिवस आधीचं दह्याचं विरजणही चालेल. पण जास्त जुनं किंवा आंबट विरजण असेल तर दही व्यवस्थित लागत नाही.
व्यवस्थित एकजीव करा
दूधात विरजण मिसळल्यानंतर चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित एकजीव करून घ्या. यामुळे दही घट्ट होण्यास मदत होईल.
दही कितीवेळ ठेवावं?
विरजण लावल्यानंतर दुधाचं भांडं झाकून कोणत्याही गरम जागेवर ठेवा. उन्हाळ्याच्या दिवसांत स्वयंपाकघरातसुद्धा उत्तम दही लागतं. जवळपास १० ते १२ तास तसंच ठेवा सकाळी पाहाल तर घट्ट लागलेलं दिसून येईल.
Web Summary : Make thick, creamy curd at home using full cream milk. Boil milk well, use lukewarm milk with 1-2 spoons curd, mix well. Set aside for 10-12 hours in warm place.
Web Summary : फुल क्रीम दूध से घर पर गाढ़ा दही जमाएं। दूध को अच्छी तरह उबालें, गुनगुना दूध और 1-2 चम्मच दही मिलाएं। 10-12 घंटे के लिए गर्म जगह पर रखें।