Join us

उन्हाळ्यात सारखं दूध नासतं? नासलेलं दूध न फेकता करा २ चविष्ट पदार्थ, पाहा सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2024 16:49 IST

How To Reuse Sour Milk Or Nasalela Dudh: उन्हाळ्यात दूध बऱ्याचदा नासतं. हे नासलेलं दूध मुळीच फेकून देऊ नका. कारण त्यापासून खूप चवदार पदार्थ तयार करता येतात...

ठळक मुद्देत्या दुधापासून २ अतिशय उत्तम आणि पौष्टिक पदार्थ तयार करता येतात. हे दोन्ही पदार्थ असे आहेत की ते घरातल्या सगळ्याच मंडळींना खूप आवडतील.

उन्हाळ्याच्या दिवसात उष्णताच एवढी असते की त्यामुळे दूध बऱ्याचदा नासून जातं. त्यामुळे मग पैसे वाया जातात म्हणून फार वाईट वाटतं. नासलेलं दूध असं वारंवार फेकून देताना खूप वाईटही वाटतं. म्हणूनच आता नासलेलं दूध अजिबात फेकून देऊ नका. त्या दुधापासून २ अतिशय उत्तम आणि पौष्टिक पदार्थ तयार करता येतात. हे दोन्ही पदार्थ असे आहेत की ते घरातल्या सगळ्याच मंडळींना खूप आवडतील. शिवाय ते करण्यासाठी खूप वेळ देखील लागत नाही. अगदी झटपट होणारे ते दोन पौष्टिक, चवदार पदार्थ कोणते ते पाहा.. (how to reuse sour milk or nasalela dudh)

नासलेल्या दुधापासून तयार होणारे पदार्थ

 

१. कलाकंद

कलाकंद ही अतिशय चवदार मिठाई नासलेल्या दुधापासून तयार करता येते. घरी तयार केलेली ही मिठाई एवढी चवदार होईल की अगदी दुकानातून घेतलेल्या मिठाईलाही तिची सर येणार नाही.

केस गळणं थांबेना? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात रोज 'ही' पावडर चिमूटभर खा, ८ दिवसांतच केस गळणं कमी  

कलाकंद करण्यासाठी नासलेल्या दुधातलं पाणी पुर्णपणे काढून टाका. त्यानंतर जो घट्ट पांढरा भाग आहे तो कढईमध्ये टाकून गरम करा. सुरुवातीला त्यातून पाणी येईल. हळूहळू ते पाणी आटून जाईल आणि घट्ट गोळा होईल. असं झालं की त्यात चवीनुसार साखर, वेलची पूड, केशर घाला आणि पुन्हा एकदा साखर आटेपर्यंत मिश्रण गरम करा. हे वारंवार हलवत राहावे. काही वेळातच अतिशय चवदार कलाकंद तयार...

 

२. पनीर

पनीर हा लहान मुलांच्या अतिशय आवडीचा पदार्थ. तो करण्यासाठी नासलेल्या दुधातलं पाणी पुर्णपणे काढून टाका. श्रीखंडसाठी चक्का बांधून ठेवता, तसं कपडा लावून दाबून दाबून पाणी काढून टाका.

हात- पाय बारीक पण पोट सुटत चाललं? बघा तुळस- दालचिनीचा खास उपाय, पोट होईल सपाट

आता जो घट्ट भाग आहे तो एका कपड्यात गुंडाळा. त्यावर खलबत्ता, पोळपाट असं काही तरी ओझं ठेवा. १५ ते २० मिनिटांनी त्यावरचं ओझं काढून टाका आणि कपडा हळूच काढा. आतमध्ये मस्त घट्ट पनीर तयार झालं असेल. या पनीरपासून तुम्हाला हवा तो पदार्थ करून खा. घरच्या पनीरची चव काही वेगळीच लागते. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीदूध