हिरव्या पालेभाज्या आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत. जीवनसत्त्वे, खनिजे, लोह आणि फायबरचा साठा असलेल्या या भाज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी (how to eat green leafy vegetables properly) आणि संपूर्ण आरोग्य उत्तम राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. हिरव्या पालेभाज्या खाणे हे आरोग्यासाठी फायद्याचे आहे, हे आपल्याला माहीत आहे; पण अनेकदा आपण पालेभाज्या तयार करताना किंवा खाताना काही लहान - सहान चुका करतो. या चुकांमुळे भाज्यांमधील बहुमोल पोषक घटक शिजवताना किंवा भाज्या स्टोअर करताना नष्ट होतात आणि आपल्या शरीराला त्याचे हवे तितके फायदे मिळत नाहीत(how to retain nutrients in green vegetables).
जर आपल्याला पालेभाज्यांचे १००% पोषणमूल्य मिळवायचे असेल, तर त्या फक्त खाणेच पुरेसे नाही, तर त्या खाण्याचे आणि तयार करण्याचे योग्य नियम पाळणे देखील तितकेच गरजेचे असते. पालेभाज्यांमधील पोषक घटक व्यवस्थितरीत्या शरीराला मिळावेत यासाठी कोणते तीन महत्त्वाचे नियम लक्षात ठेवले पाहिजेत, जेणेकरून आपले आरोग्य नेहमी सुदृढ राहील ते पाहूयात(best way to eat green vegetables).
पालेभाज्या खाण्याचे सोपे ३ नियम पाळा...
१. रंगीबेरंगी भाज्यांचा आहारात समावेश करा :- न्यूट्रीव्हाइज क्लिनिकच्या न्यूट्रिशनिस्ट नेहा सिन्हा यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही फक्त एकाच प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या खात असाल तर आरोग्याला त्याचे पूर्ण फायदे मिळणार नाहीत. तुमच्या ताटात कायम रंगीबेरंगी भाज्यांचा समावेश करा. हिरव्या रंगाच्या भाज्यांमध्ये लोह आणि फोलेटसारखी पोषक तत्वे असतात. तर, लाल आणि नारंगी रंगाच्या भाज्या बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन-ए देतात. रोजच्या आहारात वेगवेगळ्या रंगाच्या ४ ते ५ प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
उडपी हॉटेलात मिळते तसे करा इडली-डोसा पीठ, ७ स्टेप्स- इडली कापसासारखी आणि डोसा कुरकुरीत...
२. हिरव्या पालेभाज्या योग्य प्रमाणांत खा :- हिरव्या भाज्या खाण्याचे फायदे आपल्याला तेव्हाच मिळतील, जेव्हा आपण त्या योग्य प्रमाणात आहारात समाविष्ट करु. हिरव्या भाज्यांचा आहारात जास्त प्रमाणांत समावेश केल्यास पोटात गॅस होणे, पोट फुगणे आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्या वारंवार त्रास देऊ शकतात. त्यामुळे ताटात हिरव्या भाज्यांचे प्रमाण संतुलित ठेवा. ताटाच्या अर्ध्या भागात भाज्या घ्या आणि उर्वरित भागात प्रोटीन आणि कार्ब्स यांचा समावेश करा. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत दोघांनीही आठवड्यातून किमान ५ वेळा हिरव्या पालेभाज्या नक्की खाव्यात, परंतु दिवसभरात फक्त २०० ते २५० ग्रॅम इतक्या प्रमाणातच पालेभाजी खावी.
तूप खाऊन पोटाची ढेरी होईल कमी! दिसेल परफेक्ट फिगर - चुकवू नका तूप खाण्याची 'ही' पद्धत...
३. भाज्या योग्य प्रकारे शिजवून खा :- न्यूट्रीशनिस्ट नेहा सिन्हा यांनी सांगितले की, जर भाज्या जास्त वेळ शिजवून खाल्ल्या तर त्यातील व्हिटॅमिन-बी, सी आणि फोलेट सारखी पोषक तत्वे नष्ट होतात. भाज्या जास्त शिजवून खाल्ल्याने त्यांच्या पोषक तत्वांचा प्रभाव कमी होऊ लागतो. उकडण्याऐवजी, भाज्यांना वाफेवर शिजवावे किंवा हलके परतून खावे. यामुळे चव आणि पोषक तत्वे दोन्ही टिकून राहतात. भाज्यांना कमी वेळेत शिजवून खाल्ल्याने त्यातील पोषक तत्व योग्य प्रमाणात टिकून राहण्यास मदत होते.