उन्हाळ्यात थंड आणि रसदार फळं खाण्याचा आनंद वेगळाच असतो. या फळांनी शरीराला तर आराम मिळतोच, सोबतच मनही शांत होतं. पण या दिवसांमध्ये वाढलेल्या तापमानामुळे एक समस्या सगळ्यांनाच होते. ती म्हणजे आपण कापलेली फळं काही वेळातच रंग बदलू लागतात. काही फळांवर काळा रंग चढतो आणि त्यांचा फ्रेश लूकही जातो. काळी पडलेली फळं खाण्याची इच्छा देखील होत नाही. आपल्याला सुद्धा ही समस्या होत असेल तर एक खास ट्रिक आपली मदत करू शकते. या ट्रिकने फळं कापल्यानंतरही जास्त वेळ फ्रेश राहतात आणि त्यांची टेस्टही तशीच राहते.
कापलेल्या फळांचा रंग का बदलतो?
जेव्हा एखादं फळ कापलं जातं तेव्हा आतील भाग हवेच्या संपर्कात येतो. यादरम्यान ऑक्सीकरणची प्रक्रिया सुरू होते. याच कारणाने सफरचंद, केळी आणि पेर, पेरू यांसारखी फळं लवकर ब्राउन होतात. ही प्रक्रिया तर नॅचरल आहे, पण एक ट्रिक वापरून ही प्रक्रिया स्लो करता येते.
कापलेल्या फळांसाठी खास ट्रिक
कापलेली फळं फ्रेश ठेवण्यासाठी एक वाट्यामध्ये थंड पाणी घ्या. त्यात एक ते दोन लिंबाचा रस घाला आणि थोडी साखर टाका. आता कापलेली फळं या मिश्रणात २ ते ३ मिनिटांसाठी बुडवून ठेवा. त्यानंतर खाऊ शकता किंवा स्टोर करू शकता.
कशी काम करते ही ट्रिक?
लिंबामधील व्हिटामिन सी ने ऑक्सीकरणाची प्रक्रिया स्लो होते. यामुळे फळं लवकर काळे होत नाहीत. तेच साखरेने फळांची टेस्ट बॅलन्स राहते आणि त्यांचा नॅचरल गोडवाही कायम राहतो. या कॉम्बिनेशनने कापलेली फळं जास्त वेळ फ्रेश राहतात. जी फळं कापल्यानंतर रंग बदलतात त्यांच्यासाठी ही ट्रिक फायदेशीर ठरते.
काय काळजी घ्याल?
कापलेली फळं जास्त वेळ उघड्यावर ठेवू नका. ती नेहमीच एअरटाइट कंटेनरमध्ये स्टोर करा. जर लगेच खात नसाल तर फ्रीजमध्ये ठेवा. असं केल्याने त्यांच्यातील फ्रेशनेस जास्त वेळ टिकून राहतो.
