Lokmat Sakhi >Food > कांदा-लसणाला हिरवे कोंब फुटले, टाकून द्यावे लागतात? १ उपाय-कांदा लसूण लवकर खराब होणार नाही...

कांदा-लसणाला हिरवे कोंब फुटले, टाकून द्यावे लागतात? १ उपाय-कांदा लसूण लवकर खराब होणार नाही...

How to prevent onion & garlic sprouting during summer season : How To Keep Garlic & Onion From Sprouting Easy Tips And Tricks : कांदा,लसूण उन्हाळ्यात खराब होऊन त्यांना कोंब फुटू नये यासाठी एक खास घरगुती उपाय पाहूयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2025 14:49 IST2025-05-23T14:34:19+5:302025-05-23T14:49:28+5:30

How to prevent onion & garlic sprouting during summer season : How To Keep Garlic & Onion From Sprouting Easy Tips And Tricks : कांदा,लसूण उन्हाळ्यात खराब होऊन त्यांना कोंब फुटू नये यासाठी एक खास घरगुती उपाय पाहूयात.

How to prevent onion & garlic sprouting during summer season How To Keep Garlic & Onion From Sprouting Easy Tips And Tricks | कांदा-लसणाला हिरवे कोंब फुटले, टाकून द्यावे लागतात? १ उपाय-कांदा लसूण लवकर खराब होणार नाही...

कांदा-लसणाला हिरवे कोंब फुटले, टाकून द्यावे लागतात? १ उपाय-कांदा लसूण लवकर खराब होणार नाही...

कडाक्याच्या उन्हामुळे स्वयंपाकघरातील अनेक पदार्थ खराब होऊन वायाच जातात. कित्येकदा आपण उन्हाळ्यात किचनधील पदार्थ खराब होऊ नये म्हणून त्यांची विशेष काळजी घेतो तरी देखील काही पदार्थ खराब होतातच. उन्हाळ्याच्या कडक तापमानात कांदा आणि लसूण या स्वयंपाकघरातील अत्यावश्यक भाज्यांना अगदी सहजपणे कोंब (How to prevent onion & garlic sprouting during summer season) फुटू लागतात. भाज्यांना अशा प्रकारे कोंब फुटण्याची ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी, त्यामुळे त्यांची टिकवण क्षमता कमी होते, चव आणि पोषणमूल्यही घटते. विशेषतः उष्ण हवामानात योग्य पद्धतीने साठवण न केल्यास कांदा आणि लसणावर कोंब फुटू लागतात. असे कोंब फुटू लागले म्हणजे पुढच्या काही दिवसांतच लसूण व कांदा सडून खराब होतोच( How To Keep Garlic & Onion From Sprouting Easy Tips And Tricks).

काहीवेळा आपण स्वस्त मिळाले म्हणून जास्तीचे लसूण व कांदा विकत घेऊन ठेवतो. परंतु काही दिवसांनी त्यांना कोंब येऊन ते सडू लागतात, विशेषतः हे उन्हाळ्यात होतेच. अशा प्रकारे कोंब आलेले लसूण आणि कांदे वापरणे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असते. यासाठीच, आपण असे कोंब आलेले कांदा लसूण वापरण्यापेक्षा ते फेकून देतो, परंतु कांदा व लसूण (onion & garlic sprouting) यांना कोंब येऊ नये यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. कांदा व लसूण उन्हाळ्यात खराब होऊन त्यांना कोंब येऊ नये यासाठी एक खास घरगुती उपाय पाहूयात. 

कांदा व लसूण यांना कोंब येऊ नये म्हणून... 

कांदा व लसूण यांना कोंब येऊ नये म्हणून करायच्या खास घरगुती उपायामध्ये, चहा पावडर, सैंधव मीठ आणि तुरटीची पावडर इतक्या फक्त तीनच पदार्थांची गरज लागणार आहे. 

पारंपरिक बंगाली चवीचं 'आम दोही' खाऊन तर पाहा! उन्हाळ्यातील थंडगार मेजवानी, अगदी सोपा पदा‌र्थ...

एका मिनिटांत काढा किलोभर भाजलेल्या शेंगदाण्याची टरफलं! रणबीर ब्रारची पाहा १ भन्नाट ट्रिक...

कांदा व लसूण यांना कोंब येऊ नये म्हणून सर्वातआधी, एक मोठी टोपली किंवा थोडं पसरट भांडं घ्याव. त्यानंतर, या भांड्याच्या तळाशी एक वर्तमानपत्र पसरवून अंथरुन घ्यावा. आता एक प्लेट घेऊन त्यात चहा पावडर, सैंधव मीठ आणि तुरटीची पावडर असे तिन्ही जिन्नस एकत्रित करून मिसळून घ्यावे. आता हे तयार मिश्रण वर्तमानपत्रावर टाकून सर्वत्र पसरवून त्याचा एक पातळसर थर तयार करावा. त्यानंतर, या मिश्रणावर थेट कांदे, बटाटे, लसूण ठेवून द्यावेत.

गरमागरम चहा पिण्याची तलफ आता भागवा कधीही, कुठेही! पाहा २ मिनिटांत ‘चहा’ची भन्नाट आयडिया...

चहा पावडर, सैंधव मीठ आणि तुरटीची पावडर या तीन पदार्थांच्या एकत्रित मिश्रणाने कांदे, बटाटे, लसूण यांना उन्हाळ्यात कोंब येणार नाहीत. याशिवाय, कधीही कांदा आणि लसूण एकत्र साठवून ठेवू नयेत. नेहमी कांदा आणि लसूण मोठ्या टोपलीमध्ये पसरवून ठेवावेत. यामुळे ते लवकर सडत नाहीत तसेच त्यांना कोंब फुटून ते खराब देखील न होता दीर्घकाळ टिकतात. कांदा-लसूण साठवण्यासाठी थंड आणि हवेशीर जागा निवडावी. कांदा - लसूण वर्तमानपत्रावर पसरवून किंवा वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवले, तर त्यांना पटकन कोंब फुटणार नाहीत. 

उन्हाळ्यात उष्णता आणि आर्द्रतेमुळे कांदा आणि लसूण लवकर अंकुरित होतात, ज्यामुळे त्यांचा स्वाद, पोषणमूल्य आणि टिकवण्याची क्षमता कमी होते. परंतु वरील उपाय केल्यास त्यांची टिकवण्याची क्षमता वाढवता येते आणि कोंब फुटण्याची प्रक्रिया मंदावता येते. त्यामुळे स्वयंपाकघरातील या महत्त्वाच्या भाज्या खराब न होता दीर्घकाळ टिकतात आणि अधिक काळ त्यांचा वापर करता येतो.

Web Title: How to prevent onion & garlic sprouting during summer season How To Keep Garlic & Onion From Sprouting Easy Tips And Tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.