lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > नूडल्स करताना चिकट लगदा होतो ? शेफ पंकज भदोरिया सांगतात १ सोपी ट्रिक, नूडल्स होतील मस्त मोकळ्या...

नूडल्स करताना चिकट लगदा होतो ? शेफ पंकज भदोरिया सांगतात १ सोपी ट्रिक, नूडल्स होतील मस्त मोकळ्या...

HOW TO MAKE NON STICKY NOODLES AT HOME : चायनीज नूडल्स शिजवताना एकमेकांना चिकटून त्याचा लगदा होऊ नये यासाठी काही खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2023 12:39 PM2023-09-06T12:39:29+5:302023-09-06T13:00:05+5:30

HOW TO MAKE NON STICKY NOODLES AT HOME : चायनीज नूडल्स शिजवताना एकमेकांना चिकटून त्याचा लगदा होऊ नये यासाठी काही खास टिप्स...

How To Prevent Noodles From Sticking Together. | नूडल्स करताना चिकट लगदा होतो ? शेफ पंकज भदोरिया सांगतात १ सोपी ट्रिक, नूडल्स होतील मस्त मोकळ्या...

नूडल्स करताना चिकट लगदा होतो ? शेफ पंकज भदोरिया सांगतात १ सोपी ट्रिक, नूडल्स होतील मस्त मोकळ्या...

चायनीज पदार्थांच नाव काढल की डोळ्यासमोर सर्वातआधी येतात ते नूडल्स. आपल्याला चायनीज खायचा मूड झाला की आपण लगेच बाहेरून ऑर्डर करतो किंवा काहीवेळा घरीच बनवून खातो. गरमागरम नूडल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, चायनीज सॉसेस घालूंन ते खायला खूपच चटकदार लागतात. मोठमोठाल्या हॉटेल्स किंवा रेस्टोरंटमधून ऑर्डर केलेने नूडल्स खाताना आपल्याला वेगळेच समाधान मिळते. हेच नूडल्स जर घरी बनवायचे म्हटले की, आपल्या मनात एक प्रकराची भीती वाटते. घरी नूडल्स बनवायचा घाट घातला की, ते बाहेरच्या हॉटेल्स किंवा रेस्टोरंटमध्ये मिळतात तसे होत नाही(How To Boil Perfect Non-sticky Noodle).

जेव्हा घरीच नूडल्स बनवायचे ठरवतो तेव्हा ते विकतसारखे न होता चिकट होतात. आपण कितीही प्रयत्न केला तरीही हे नूडल्स एकमेकांना चिकटून (How to prevent noodles from sticking) काहीवेळा त्याचा लगदा तयार होतो. असे चिकट किंवा लगदा झालेले नूडल्स खाण्यात काहीच मजा उरत नाही. बाहेर विकत मिळणारे नूडल्स हे एकमेकांना न चिकटता एकमेकांपासून मोकळे असतात. नूडल्स जर आपल्याला घरी बनवायचे असतील तर ते मोकळे होण्यासाठी काही टिप्स फॉलो करु शकतो. मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी नूडल्स नॉनस्टिक(Method To Cook Perfect Non-sticky Noodles) होण्यासाठीच्या टिप्स इंस्टाग्राम व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत(How To Prevent Noodles From Sticking Together).

नूडल्स नॉनस्टिक होण्यासाठी काही खास टिप्स... 

१. नूडल्स बनवताना सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत पाणी व्यवस्थित गरम करून घ्यावे. (पाणी उकळून त्यात जोपर्यंत बुडबुडे येत नाहीत तोपर्यंत पाणी गरम करून घ्यावे). 

२. पाणी व्यवस्थित उकळून झाल्यानंतर त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून मीठ व तेल घालून ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. 

उरलेले पनीर फ्रिजमध्ये ठेवले तरी लगेच शिळे - पिवळे दिसते, १ सोपी ट्रिक- पनीर राहील ताजे फ्रेश!

३. आता या उकळत्या पाण्यांत नूडल्स घालून ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्यावेत. 

४. ४ ते ५ मिनिटांनंतर हे नूडल्स जवळजवळ अर्धे शिजून तयार असतील. जर आपण नीट पहिले तर या नूडल्सच्यामध्ये, आपल्याला एक पांढरी लाईन दिसून येईल. 

पेरी -पेरी मखाणा मिक्स - सायंकाळी खा, वजनही वाढणार नाही आणि चटकमटक खाताही येईल !

एक थेंब ही तेल न वापरता फाफडा करता येतो ? पाहा, बिनतेलाची कुरकुरीत फाफडा रेसिपी...

५. आता हे नूडल्स एका मोठ्या गाळणीमध्ये काढून त्यातील पाणी संपूर्णपणे निथळून जाऊ द्यावे. 

६. गाळणीत नूडल्स काढल्यानंतर त्यातील सगळे पाणी निथळून गेल्यानंतर, त्यावर थंड पाणी ओतावे. 

७. आता हे नूडल्स आपण गाळणीतून सगळे पाणी निथळून गेल्यानंतर एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्यावेत. 

८. मग या नूडल्सवर चमचाभर तेल सर्वत्र पसरवून ओतून घ्यावे व काटा चमच्याच्या मदतीने हे नूडल्स थोडेसे हलवून मोकळे करून थंड होण्यासाठी तसेच ठेवून द्यावेत. 

मोड आलेली कच्ची उसळ चिकट होते, आंबूस वास येतो ? १ भन्नाट ट्रिक, उसळ राहील फ्रेश...

अशाप्रकारे आपण मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी सांगितलेल्या ट्रिक्सचा वापर करून नूडल्स चिकट किंवा लगदा होण्यापासून रोखू शकतो.

Web Title: How To Prevent Noodles From Sticking Together.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.