Lokmat Sakhi >Food > खरबुजाच्या बिया फायदेशीर ! १ भन्नाट ट्रिक, महागामोलाचे मगज बी विकत आणायची गरजच नाही...

खरबुजाच्या बिया फायदेशीर ! १ भन्नाट ट्रिक, महागामोलाचे मगज बी विकत आणायची गरजच नाही...

Don’t throw melon seeds use them for your gravy : How to Peel Melon Seeds : how to clean and store muskmelon seed : muskmelon seed peeling : how to peel muskmelon seeds : खरबूज खाऊन बिया आपण कचऱ्यात फेकतो, असे न करता, या बियांच करायचं काय ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2025 17:08 IST2025-05-02T17:07:54+5:302025-05-02T17:08:37+5:30

Don’t throw melon seeds use them for your gravy : How to Peel Melon Seeds : how to clean and store muskmelon seed : muskmelon seed peeling : how to peel muskmelon seeds : खरबूज खाऊन बिया आपण कचऱ्यात फेकतो, असे न करता, या बियांच करायचं काय ते पाहा...

How to Peel Melon Seeds how to clean and store muskmelon seed muskmelon seed peeling how to peel muskmelon seeds | खरबुजाच्या बिया फायदेशीर ! १ भन्नाट ट्रिक, महागामोलाचे मगज बी विकत आणायची गरजच नाही...

खरबुजाच्या बिया फायदेशीर ! १ भन्नाट ट्रिक, महागामोलाचे मगज बी विकत आणायची गरजच नाही...

उन्हाळा आला की आपण कलिंगड, खरबूज यांसारखी रसाळ फळं खातोच. या फळांत पाण्याचे प्रमाण अधिक जास्त असल्याने अशी रसाळ फळं खाणे अधिक फायदेशीर (How to Peel Melon Seeds) मानले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत घरोघरी हमखास रसाळ, गोड चवीचं खरबूज विकत आणलं (how to clean and store muskmelon seed) जातं. काहीजणांना खरबूज बियांसहित खाणे  पसंत असते तर काहीजण बिया काढून मगच ते खातात. परंतु खरबुजाच्या बिया काढून टाकण्यापेक्षा त्या खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते. कारण खरबुजा एवढ्याच त्याच्या बियाही तितक्याच पौष्टिक असतात(how to peel muskmelon seeds).

खरबूजमध्ये प्रथिने, कर्बोदके, पाणी, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम,सोडियम, विविध जीवनसत्त्वे, थायामिन इ. पोषक घटक असतात. खरबूजाच्या फळापासून त्याच्या बियांपर्यंत सर्व भाग आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी असतात. यासाठीच, या बिया फेकून न देता आपण त्या व्यवस्थित सुकवून वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी त्यात घालू शकतो. भाजीची ग्रेव्ही घट्ट दाटसर करण्यासाठी तसेच पदार्थांची चव अधिक टेस्टी करण्यासाठी आपण या बियांची पावडर किंवा या बियांचा वापर करु शकतो. खरबुजाच्या बिया फेकून न देता त्या सुकवून त्याची पावडर कशी करावी याची सोपी रेसिपी पाहूयात. 

नेमकं करायचं काय ?

सगळ्यांत आधी खरबूज चिरून घ्यावे. मग चमच्याच्या मदतीने यातील सगळ्या बिया काढून एका बाऊलमध्ये घ्याव्यात. आता एका दुसऱ्या बाऊलमध्ये पाणी घ्यावे. पाण्याने भरलेल्या बाऊलमध्ये या सगळ्या बिया घालून हाताने हलकेच दाब देत बिया पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात. त्यानंतर, किमान ३ ते ४ वेळा पाणी बदलून या बिया स्वच्छ धुवून घ्याव्यात. 

पनीर तळल्यानंतर रबरासारखे चिवट होते? १ साधीसोपी ट्रिक - तळल्यानंतरही पनीर राहील मऊमुलायम...

बिया स्वच्छ धुवून, या बियांना लागलेला गर संपूर्णपणे काढून घ्यावा. त्यानंतर, झाऱ्याने किंवा गाळणीच्या मदतीने बिया पाण्यातून गाळून घ्याव्यात. त्यानंतर, या सगळ्या बिया एका डिशमध्ये पसरवून ठेवाव्यात. ही डिश ३ ते ४ दिवस उन्हांत ठेवून बिया संपूर्णपणे वाळवून घ्याव्यात. बिया वाळल्यानंतर हलकेच हाताने रगडून त्यावरील पांढरे सालं काढून घ्यावे. आता या बिया एका पॅनमध्ये घालून कोरड्याच परतून घ्याव्यात. त्यानंतर या बिया एका डिशमध्ये काढून थोड्या थंड होऊ द्याव्यात. बिया थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्यावी. मगज पावडर तयार आहे. जर तुम्हाला पावडर नको असेल तर तुम्ही या बिया कोरड्या परतून देखील मग स्टोअर करून ठेवू शकता. 

मिक्सरशिवाय १० मिनिटांत करा आमरस - झटपट रस काढण्याची पाहा एक भन्नाट ट्रिक...

मिक्सरमध्ये बारीक पावडर झाल्यावर, गाळणीने पावडर गाळून घ्यावी. ही तयार पावडर एका काचेच्या एअर टाईट कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवावी. शाही भाज्यांची ग्रेव्ही करताना किंवा ग्रेव्हीला घट्ट दाटसरपणा आणण्यासाठी चमचाभर ही मगज बियांची पावडर घालावी, यामुळे भाज्यांची चव देखील दुपटीने वाढते. काजूच्या पेस्ट ऐवजी तुम्ही ही मगज बियांची पावडर देखील वापरू शकता.


Web Title: How to Peel Melon Seeds how to clean and store muskmelon seed muskmelon seed peeling how to peel muskmelon seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.