Join us

हात न लावता २ मिनिटात लसूण सोलण्याची स्मार्ट ट्रिक; स्वंयपाकाचा वाचेल वेळ, कामं होतील भरभर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 17:02 IST

How to Peel Garlic in Two Minutes : लसूण सोलण्याचं काम वेळखाऊ, त्यावर हा उपाय.

जेवणं बनवणं सोप्पं काम असलं तरी कांदा कापणं, लसूण सोलणं, वाटण तयार करणं या कामांमध्ये बराचवेळ जातो.  लसूण सोलल्यानंतर नखं दुखतात तर कधी खूपच वेळ जातो. (Cooking  Hacks) खरंतर लसूण सोलणं हे खूपच कंटाळवाणं काम पण लसणाशिवाय भाज्यांना चवच येत नाही. (How to peel garlic in two minutes) ) लसूण पटापट सोलण्याच्या सोप्या ट्रिक्स  पाहूया. (Kitchen Tricks & Tips)

लसूण सोलण्याची सोपी ट्रिक

१) सगळ्यात आधी लसूण सोलून वेगळे करा, त्यानंतर एका भांड्यात  पाणी ठेवून गरम करा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या घाला. लो फ्लेमवर एक मिनिटासाठी लसूण गरम करा. एकदा लसूण ढवळल्यानंतर गॅस बंद करा. लसूण एक मिनिटासाठी पाण्यात बुडवून ठेवा. (How to peel indian garlic easily)

२) तुम्ही पाहाल की लसणाचे साल पाण्यात वेगळे झाले आहेत.  ज्या लसणांची सालं निघालेली नाहीत त्यांन हलक्या हातानं चोळून सालं काढून घ्या. जर तुम्हाला पाणी गरम करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही थंड पाण्यात लसूण भिजवून ठेवू शकता. यामुळे लसणाची सालं लगेच निघायला मदत होईल.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न