Lokmat Sakhi >Food > उकडलेले बटाटे सोलताना हात पोळतात? १ भन्नाट आयडिया- काही सेकंदातच सोला किलोभर बटाटे..

उकडलेले बटाटे सोलताना हात पोळतात? १ भन्नाट आयडिया- काही सेकंदातच सोला किलोभर बटाटे..

Kitchen Tips: गरमागरम बटाटे सोलताना खरोखरच हात खूप पोळतात. म्हणूनच ही ट्रिक पाहून घ्या.. तुम्हाला खूप उपयोगी येईल.(simple trick to peel off boiled potato quickly)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2025 11:45 IST2025-06-20T11:43:06+5:302025-06-20T11:45:18+5:30

Kitchen Tips: गरमागरम बटाटे सोलताना खरोखरच हात खूप पोळतात. म्हणूनच ही ट्रिक पाहून घ्या.. तुम्हाला खूप उपयोगी येईल.(simple trick to peel off boiled potato quickly)

how to peel boiled potato within few seconds, simple trick to peel off boiled potato quickly | उकडलेले बटाटे सोलताना हात पोळतात? १ भन्नाट आयडिया- काही सेकंदातच सोला किलोभर बटाटे..

उकडलेले बटाटे सोलताना हात पोळतात? १ भन्नाट आयडिया- काही सेकंदातच सोला किलोभर बटाटे..

Highlightsउकडलेले बटाटे एका ताटामध्ये काढा. बटाट्याचा कापलेला सपाट भाग ताटावर राहील अशा पद्धतीने बटाटे ठेवा.

बटाट्याची भाजी हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. लहान मुलांना तर बटाटे उकडून केलेली भाजी खूप आवडते. त्यामुळे सकाळी शाळेची धावपळ असताना गरमागरम बटाटे उकडण्याचे अवघड काम कित्येक महिलांना नेहमीच करावे लागते. कारण उकडलेले बटाटे थंड होण्याएवढा वेळच नसतो. असे उकडलेले गरमागरम बटाटे घाई-गडबडीत सोलताना मग हाताला खूप चटके बसतात (how to peel boiled potato within few seconds?). आता हाताला चटके न बसू देता अवघ्या काही सेकंदात भरपूर बटाटे सोलून घ्यायचे असतील तर ही एक ट्रिक पाहाच.. हा उपाय स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकालाच अतिशय उपयुक्त ठरणारा आहे.(simple trick to peel off boiled potato quickly)

 

उकडलेले बटाटे झटपट सोलण्याची ट्रिक

उकडलेले गरमागरम बटाटे अवघ्या काही सेकंदात हाताला चटका न बसू देता पटापट कसे सोलावे याची माहिती swad_ka_vardan या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

तुमच्यासोबतच तुमचं अख्खं कुटूंब राहील निरोगी, सुदृढ! ८ सवयी लावून घ्या, तब्येत राहील ठणठणीत

हा उपाय करण्यासाठी नेहमीप्रमाणे बटाटे उकडून घ्या. पण बटाटे उकडायला लावताना ते आकाराने लहान जरी असतील तरी एका बटाट्याचे मधोमध दोन काप करून नंतर ते उकडायला लावा.

आता उकडलेले बटाटे एका ताटामध्ये काढा. बटाट्याचा कापलेला सपाट भाग ताटावर राहील अशा पद्धतीने बटाटे ठेवा.

 

यानंतर एक कपडा घ्या. तो थंड पाण्यामध्ये बुडवा आणि हलकासा पिळून घ्या. हा ओलसर कपडा बटाट्यांवर टाकून सगळे बटाटे व्यवस्थित झाकून घ्या..

साखरआंब्याला बुरा येऊन लगेच खराब होतो? घ्या रेसिपी- पाक परफेक्ट होऊन वर्षभर टिकेल 

आता आणखी एक दुसरे ताट घ्या आणि ते ताट त्या कपड्यावर ठेवा. दोन ते तीन वेळ हलकासा दाब देऊन ताट तिथल्यातिथेच एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे याप्रमाणे ४ ते ५ वेळा फिरवा.

यानंतर ताट आणि बटाट्यांवरचा ओला कपडा काढून घ्या. बटाटे किंचित दाबलेले दिसतील आणि त्यांची सालं वेगळी झालेली असतील. आता पटापट ही सालं उचलून टाका. ही सगळी क्रिया वाचायला लांबलचक वाटत असली तरी ती अवघ्या काही सेकंदात होते. एकदा नक्की ट्राय करून पाहा. 


 

Web Title: how to peel boiled potato within few seconds, simple trick to peel off boiled potato quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.