बेसनाचा पोळा किंवा रव्याची पोळी तसंच ओट्सचा पराठा, डोसा तुम्ही नेहमीच खाल्ला असेल. पण ज्या लोकांना पीठ मळता येत नाही, चपात्या करता येत नाही त्यांच्यासाठी गव्हाच्या पीठाचा पोळा किंवा डोसा हा उत्तम पर्याय आहे (How to Make Wheat Floor Dosa). हा पोळा चवीला टेस्टी तसंच हेल्दी पर्यायसुद्धा आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी भुकेच्या वेळेत पटकन काहीतरी खाण्यासाठी हा डोसा बनवू शकता. गव्हाच्या पीठाचा डोसा करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to Make Wheat Floor Dosa)
गव्हाच्या पिठाचा डोसा कसा करायचा?
यासाठी 2 वाटी गव्हाच्या पीठात 1 वाटी दही घाला. अर्धा चमचा मिरची पावडर तसंच 1 चमचा धणे पावडर घाला. नंतर अर्धा चमचा बारीक केलेलं आलं, बारीक चिरलेली मिरची आणि अर्धा चमचा जीरं घाला.
हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या. नंतर त्यात थोडं पाणी घालून एक पातळ मिश्रण तयार करून घ्या. जसं आपण डोसा बनवण्यासाठी करतो. हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर घाला. हे पदार्थ व्यवस्थित एकजीव करा.
नंतर तवा किंवा एखाद्या नॉन स्टिक तव्यावर तूप लावून व्यवस्थित गरम करून घ्या. गॅसची फ्लेम मिडीयम ठेवा. नंतर त्यावर बॅटर व्यवस्थित पसरवून घ्या. नंतर डोसा व्यवस्थित दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. त्यावर थोडं तेल घाला.
नंतर डोसा पलटून घ्या. दुसऱ्या बाजूनं शेकून घ्या. गरमागरम गव्हाच्या पिठाचा डोसा तयार आहे. हा डोसा तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता तसंच सॉससोबतही खाऊ शकता. डोसा मुलांना डब्यात देऊ शकता.
गव्हाच्या पिठाचा चिला पौष्टीक आणि झटपट होणारा पदार्थ आहे. तो अधिक चविष्ट आणि जाळीदार होण्यासाठी काही खास टिप्स तुम्ही वापरू शकता.
पोळा कुरकुरीत होण्यासाठी गव्हाच्या पिठात २-३ चमचे बारीक रवा किंवा तांदळाचे पीठ मिसळा यामुळे पोळा मऊ न पडता छान कुरकुरीत होतो.
हॉटेलस्टाईल शाही पनीर घरच्याघरी करा; ८ टिप्स, जेवणाला झटपट बनेल चवदार शाही पनीर
पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावं. पीठ पळीनं ओतल्यावर सहज पसरतं इतपत असावं. नुसत्या पिठापेक्षा त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, किसलेलं गाजर, कोथिंबीर आणि शिमला मिरची घातल्यास डोसा अधिक पौष्टीक होतो.
पिठात २ चमचे ताजं दही घातल्यानं पोळा मऊ होतो आणि त्याला छान आंबट-गोड चव येते. ओवा, हिरवी मिरचीची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट आणि चिमूटभर हळद घातल्यानं रंग आणि चव दोन्ही सुधारते.
कुकरमध्ये पुऱ्या करण्याची ट्रिक, १ थेंबही तेल न वापरता टम्म फुगते पुरी-होते कुरकुरीत?
डोसा घालण्यापूर्वी तवा चांगला गरम असावा. तवा थंड असेल तर डोसा चिकटण्याची शक्यता असते. जर तुम्ही लोखंडी तवा वापरत असाल तर आधी त्याला कांद्यानं थोडं तेल लावून पुसून घ्या. ज्यामुळे डोसा चिकटणार नाही.
