Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > वडापाव सोबत मिळते ती लाल चटणी घरीच करा; चमचमीत चटणी-तोंडी लावायला चविष्ट लागेल

वडापाव सोबत मिळते ती लाल चटणी घरीच करा; चमचमीत चटणी-तोंडी लावायला चविष्ट लागेल

How To Make Vada Pav Red Chutney At Home : चवदार, चविष्ट लाल चटणी घरी करायची म्हटलं तरी विकत मिळते तशी घरात बनत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार असते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 12:02 IST2025-11-23T11:25:53+5:302025-11-23T12:02:07+5:30

How To Make Vada Pav Red Chutney At Home : चवदार, चविष्ट लाल चटणी घरी करायची म्हटलं तरी विकत मिळते तशी घरात बनत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार असते.

How To Make Vada Pav Red Chutney At Home : Red Chutney Recipe How To Make Red Chutney At Home | वडापाव सोबत मिळते ती लाल चटणी घरीच करा; चमचमीत चटणी-तोंडी लावायला चविष्ट लागेल

वडापाव सोबत मिळते ती लाल चटणी घरीच करा; चमचमीत चटणी-तोंडी लावायला चविष्ट लागेल

मुंबईचा वडापाव (Vada Pav) म्हणजे फक्त एक खाद्यपदार्थ नाही ही तर ती एक भावना आहे. वडा पावसोबत मिळणारी लाल चटणी त्याची चव अधिकच वाढवते. वडापावसोबत मिळणारी लाल चटणी नेहमीच आवडीनं खाल्ली जाते. अशी चवदार, चविष्ट लाल चटणी घरी करायची म्हटलं तरी विकत मिळते तशी घरात बनत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार असते.

लाल चटणी (Red Chutney) करण्याची सोपी रेसिपी पाहूया. ही चटणी फक्त वडापावसोबत नाही तर जेवताना तोंडी लावणीसाठी तसंच चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. लाल चटणी कशी करायची ते पाहूया. (How To Make Vada Pav Red Chutney At Home)

वडापावसोबत मिळणारी लाल चटणी कशी करावी?

सर्वप्रथम बेसन पीठ पाण्यात भिजवून भज्यांसाठी करतो तसे पातळसर मिश्रण तयार करा. कढईत तेल गरम करून, या बेसनाच्या मिश्रणाचे बारीक कण किंवा थेंब गरम तेलात सोडा. जसा आपण वडा तळताना बेसनचा चुरा तयार करतो. हे कण कुरकुरीत होईपर्यंत तळा आणि बाहेर काढून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये हलकेच फिरवून त्याचा जाडसर चुरा तयार करा. वडा तळल्यानंतर कढईत जो बारीक चुरा उरतो, तो देखील वापरता येतो.

याच गरम तेलात लसणाच्या पाकळ्या हलक्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्या. तळल्याने लसणामधील कच्चा वास निघून जातो आणि चटणीला एक खास चव येते. मिक्सरच्या भांड्यात तयार केलेला बेसनाचा चुरा, तळलेल्या लसूण पाकळ्या, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घ्या. हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. ही चटणी एकदम बारीक नसावी, किंचित जाडसर असावी, तरच तिला गाडीवरच्या चटणीसारखी चव येते.

या चटणीचे खरे रहस्य तळलेला लसूण आणि बेसनचा कुरकुरीत चुरा यात आहे. चटणी बनवताना ती मिक्सरमध्ये जास्त बारीक न करता, थोडी भरड ठेवल्यास तिची चव आणि टेक्सचर अगदी वडापावच्या गाडीवरच्या चटणीसारखे लागते. ही झटपट तयार होणारी सुकी लाल चटणी तुम्ही हवाबंद डब्यात साठवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा वडापाव, डोसा किंवा इडलीसोबत खाऊ शकता.

Web Title : घर पर बनाएं वड़ा पाव की लाल चटनी: मसालेदार, स्वादिष्ट और आसान

Web Summary : घर पर वड़ा पाव के लिए लाल चटनी बनाएं! यह आसान रेसिपी भुने लहसुन और कुरकुरे बेसन के आटे का उपयोग करती है। यह चटनी कई भारतीय व्यंजनों के साथ परोसने के लिए एकदम सही है।

Web Title : Homemade Vada Pav Red Chutney: Spicy, Delicious, and Easy Recipe

Web Summary : Enhance your Vada Pav with homemade red chutney! This simple recipe uses fried garlic and crispy chickpea flour for authentic flavor. Perfect as a side with various Indian dishes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.