Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये मिळतो तसा मऊसूत उपमा घरी ५ मिनिटांत करा; सोपी रेसिपी, आवडीनं खातील सगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 17:00 IST

How To Make Upma at Home : घरी केलेला उपमा हा हॉटेलमध्ये मिळतो तसा किंवा लग्नात आचारी करतात तसा होत नाही अशी बऱ्याचजणांची तक्रार असते.

सकाळच्या नाश्त्यासाठी उपमा हा अतिशय उत्तम पर्याय आहे. उपमा हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण आवडीनं खातात. पौष्टीक आणि पोटभरीचा नाश्ता असलेला उपमा तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता (Rava Upma Recipe). घरी केलेला उपमा हा हॉटेलमध्ये मिळतो तसा किंवा लग्नात आचारी करतात तसा होत नाही अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. उपमा करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How To Make Upma at Home)

उपमा करण्याची सोपी रेसिपी

उपमा करण्यासाठी चांगल्या प्रतीच्या रव्याची निवड करा. रवा व्यवस्थित मंद आचेवर तांबूस आणि सुगंधी होईपर्यंत  व्यवस्थित भाजून घ्या. ही उपमा करण्याची सर्वात पहिली आणि महत्वाची पायरी आहे. 

रवा नीट भाजल्यामुळे उपमा  चिकट होत नाही आणि व्यवस्थित मोकळा होतो.  रवा भाजून झाल्यानंतर फोडणीची तयारी करा. कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात मोहोरी, जीरं, चणा डाळ आणि उडीद डाळ घालून खमंग फोडणी तयार करा. यात हिरवी मिरची, आलं, हिंग घातल्यानं फोडणीचा सुवास छान दरवळेल आणि चव वाढेल.

यात बारीक चिरलेला कांदा आणि तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. जसं की मटार, गाजर किंवा बीन्स घालून या भाज्या हलक्या परतवून घ्या. या भाज्या थोड्या मऊ झाल्या की त्यात रवा आणि गरजेनुसार पाणी घाला. 1 वाटी रव्यासाठी अडीच ते  तीन वाट्या पाणी वापरणं योग्य ठरतं. पाणी नेहमी उकळवून घेतलेलंच असावं. ज्यामुळे रवा लवकर आणि समान शिजतो. 

चवीनुसार मीठ घालून कढईवर झाकण ठेवा आणि मंद आचेवर वाफ काढा. शेवटी उपमा तयार झाल्यावर त्यावर ताजी कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला. तुम्हाला आवडत असेल तर शेवटी वरून एक चमचा तूप घालू शकता. यामुळे उपमा अतिशय चविष्ट आणि चमकदार दिसतो. हा उपमा चटणी किंवा सॉससोबत नाश्त्यासाठी खायला उत्तम पर्याय आहे. शेव घालूनही उपम्याची चव उत्तम लागते. आवडीनुसार लाल शेव किंवा पिवळी बारीक शेव घालून उपमा खाऊ शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : 5-Minute Rava Upma Recipe: Soft, Hotel-Style Semolina Breakfast Dish

Web Summary : Make soft, delicious upma at home! Roast semolina, prepare flavorful seasoning with lentils, add vegetables, and cook in boiling water. Garnish with coriander and lemon.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स