इडली, डोसा, उत्तप्पा किंवा मेदू वडा... अशा साऊथ इंडियन पदार्थांची खरी मजा कशात आहे, तर सोबत मिळणाऱ्या अस्सल उडपी स्टाइल नारळाच्या चटणीत... ही चटणी इतकी चविष्ट आणि परफेक्ट असते की, तिच्याशिवाय दक्षिण भारतीय पदार्थांची चव अपूर्ण वाटते. अनेकदा आपण अगदी तशीच चटणी घरी करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ती 'पारंपरिक उडपी चव' येत नाही. उडप्याच्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या त्या खास चवीच्या चटणीचा सुवास आणि तिखट-खमंग चव आपल्याला नेहमीच घरच्या चटणीत कमी जाणवते. पण आता ही अस्सल पारंपरिक उडपी चटणी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करता येते(How to Make Udupi Style South Indian Chutney at Home).
नारळ, लाल मिरच्या, आणि थोडासा गोड-तिखटपणा देणाऱ्या पदार्थांच्या योग्य मिश्रणाने तयार होणारी ही चटणी फक्त इडली-डोशांसोबतच नाही तर कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थाला विशेष चव देते. इडली-डोसा-वडासोबत खाल्ली जाणारी तीच अस्सल पारंपरिक चवीची नारळाची चटणी तयार करण्याची सोपी रेसिपी, ज्यामुळे साऊथ इंडियन पदार्थांची (Hotel Style South Indian Chutney) चव एकदम हॉटेलसारखी परफेक्ट होईल!"
साहित्य :-
१.ताज ओलं खोबरं - १ कप २. चणे - ४ टेबलस्पून (कोरडे भाजून घेतलेले)३. शेंगदाणे - ३ टेबलस्पून (कोरडे भाजून घेतलेले)४. आलं - २ छोटे तुकडे ५. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून ६. हिरव्या मिरच्या - ४ ७. पाणी - गरजेनुसार ८. लाल सुकी मिरची - २ ते ३ मिरच्या ९. हिंग - चिमूटभर १०. कडीपत्ता - ६ ते ८ पाने ११. जिरे - १ टेबलस्पून १२. मोहरी - १ टेबलस्पून १३. तेल - २ ते ३ टेबलस्पून १४. पांढरी उडीद डाळ - १ टेबलस्पून
घरीच करा पारंपरिक चवीचा हैद्राबादी दालचा! रेस्टॉरंटसारखा होईल परफेक्ट - चव भारी सुगंध दरवळेल घरभर...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका मिक्सरच्या भांड्यात ताज किसलेलं खोबरं घालावे. मग त्यात कोरडे भाजून घेतलेले चणे किंवा चणा डाळ देखील घालू शकता. २. मग यात भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, आलं, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ व थोडे पाणी घालून चटणी मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्यावी.
उडपी 'अण्णा' स्टाईल पांढरीशुभ्र चटणी! परफेक्ट चवीसाठी ७ टिप्स - डोसा, वडा, इडली खा मनसोक्त...
३. एका छोट्या भांड्यात तेल घेऊन त्यात चणा डाळ, पांढरी उडीद डाळ, मोहरी, जिरे, हिंग, लाल सुक्या मिरच्या, कडीपत्ता घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. ४. आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेली चटणी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून त्यावर ही तयार खमंग फोडणी ओतावी.
उडपी स्टाईल अस्सल पारंपरिक चवीची चटणी खाण्यासाठी तयार आहे. डोसा, उत्तप्पा, मेदू वडा, इडली सोबत आपण ही चटणी खाऊ शकता. या चटणीमुळे साऊथ इंडियन पदार्थांचा स्वाद दुपटीने वाढतो.
Web Summary : Enjoy South Indian dishes with authentic Udupi-style coconut chutney made at home. This recipe ensures a perfect, hotel-like taste for your idli, dosa, and vada, enhancing the overall flavor.
Web Summary : घर पर प्रामाणिक उडुपी-शैली नारियल चटनी के साथ दक्षिण भारतीय व्यंजनों का आनंद लें। यह रेसिपी आपके इडली, डोसा और वड़ा के लिए एक उत्तम, होटल जैसा स्वाद सुनिश्चित करती है, जिससे समग्र स्वाद बढ़ता है।