टोमॅटो केचअप हा आता असा एक पदार्थ झाला आहे जो हमखास घरोघरी दिसून येतो. कित्येक लहान मुलं तर अगदी रोजच्या रोज केचअप खातात. पोळी, ब्रेड, पराठा, इडली, डोसा असं कशासोबतही त्यांना केचअप खायला आवडतं. मोठी मंडळीही त्याला अपवाद नाहीत. कारण कित्येक पदार्थ असे आहेत की त्यांच्यासोबत जोडीला केचअप असलं की त्यांची चव जास्त खुलून येते. त्यामुळे आपल्या महिन्याच्या किराणा सामानाच्या यादीमध्ये टोमॅटो केचअप असतंच. आता विकतचं केचअप आणलं की त्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स आणि प्रिझर्व्हेटीव्ह असतात. ते तब्येतीसाठी निश्चितच चांगले नसतात (How To Make Tomato Ketchup At Home?). म्हणूनच आता मुलांना घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने टोमॅटो केचअप करून द्या (simple and easy recipe of making tomato ketchup). अगदी अर्ध्या तासात केचअप तयार करण्याची ही बघा खूप छान रेसिपी..(tomato ketchup recipe in Marathi)
घरच्याघरी टाेमॅटो केचअप कसं तयार करावं?
साहित्य
१ किलो टोमॅटो
२ मध्यम आकाराचे कांदे
८ ते ९ लसूण पाकळ्या
२ टीस्पून आल्याची पेस्ट
डॉक्टर सांगतात मधमाशी चावल्याने शरीरामध्ये होतात ४ बदल! संजय कपूरच्या बाबतीतही 'हे' झालं?
२ ते अडीच चमचे तिखट
१ टीस्पून मीठ
अर्धा टीस्पून मिरेपूड आणि दालचिनी पावडर
३ टेबलस्पून व्हिनेगर किंवा लिंबाचा रस
अर्धी वाटी साखर
कृती
सगळ्यात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या आणि ते अर्धे अर्धे चिरा. यानंतर आलं, चिरलेला कांदा, लसूण आणि चिरलेले टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून त्याची प्युरी करून घ्या.
यानंतर ही प्युरी एका पातेल्यामध्ये काढा आणि १० मिनिटे गॅस मोठा करून त्या मिश्रणाला उकळी येऊ द्या.
वजन कमी करण्याचे सोपे ४ उपाय! झटपट इंचेस लॉस होऊन ८ दिवसांतच दिसेल फरक
यानंतर साखर, लाल तिखट, मीठ, मिरेपूड, दालचिनी पावडर आणि व्हिनेगर घाला. त्यानंतर पुन्हा १० मिनिटांसाठी हे मिश्रण मध्यम आचेवर उकळू द्या. यानंतर मिश्रण थंड होऊ द्या आणि नंतर गाळून घ्या. तुमचं घरी तयार केलेलं आणि कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह तसेच केमिकल्स नसलेलं टोमॅटो केचअप तयार... ट्राय करून पाहा..