उन्हाळा असो किंवा हिवाळा, जेवणाच्या ताटात वाटीभर ताजं आणि घट्ट दही असेल तर जेवणाची चव दुपटीने वाढते. आजही आपल्यापैकी बऱ्याच घरांमध्ये दही विकत आणण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने विरजण लावून दही तयार केले जाते. परंतु अनेकदा आपण घरी दही लावतो तेव्हा ते एकतर पातळ होतं किंवा त्याला खूप पाणी सुटतं. हॉटेलमध्ये किंवा डेअरीमध्ये मिळतं तसं कवडीसारखं घट्ट दही घरी लागत नाही, असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. घरच्या घरी दही लावताना अनेकदा ते पातळ, आंबट किंवा पाणी सुटलेले असेच होते. बाजारात मिळणाऱ्या घट्ट, दाटसर आणि कवडी दह्यासारखे दही घरी तयार करणे अनेकींना अवघड वाटते. अशावेळी “विकतसारखे घट्ट दही घरी कसे तयार करायचे ?” हा प्रश्न हमखास पडतो. यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नाही, तर दुधात एक चिमूटभर सिक्रेट पदार्थ घातला की दही अगदी मऊ, घट्ट आणि दाटसर तयार होते. हा घरगुती उपाय केल्यास दही चवीला उत्तम लागेलच, शिवाय ते विकतसारखेच घट्ट व दाटसर होते(how to make thick curd like market at home).
अनेकजणी दही घट्ट होण्यासाठी दूध खूप वेळ आटवतात, पण तरीही हवा तसा परिणाम मिळत नाही. पण आता काळजी करू नका... आपण घरच्याघरीच एक सिक्रेट पदार्थ वापरुन, तो दुधात मिसळल्यास दही अगदी हलवाईसारखं दाटसर आणि मलाईदार तयार होईल. विशेष म्हणजे, यासाठी आपल्याला तासंतास दूध आटवण्याची गरज नाही. घरच्याघरी परफेक्ट दही (milk add one white ingredient to set thick curd) लावण्याची ती खास पद्धत आणि तो खास पदार्थ नेमका कोणता ते पाहूयात...
घरच्याघरीच विकतसारखे घट्ट व दाटसर दही लावण्याची भन्नाट ट्रिक...
अर्धा लिटर दुधाचे दही लावण्यासाठी साधारण १ चमचा विरजणाची गरज असते. पण दही अधिक घट्ट होण्यासाठी त्यात 'मिल्क पावडर' हा सिक्रेट पदार्थ मिसळा. अर्धा लिटर दुधासाठी सुमारे दोन चमचे मिल्क पावडर वापरावी.
दही लावण्याची योग्य पद्धत...
सर्वातआधी दूध उकळायला ठेवा. दूध कोमट झाल्यावर त्यात दोन चमचे मिल्क पावडर घालून दूध चांगले फेटून घ्या. यामुळे दही अतिशय क्रीमी आणि चविष्ट होते. आता या दुधात थोडे विरजण घालून व्यवस्थित मिक्स करा. हे दूध मातीच्या, चिनीमातीच्या किंवा स्टीलच्या भांड्यात रात्रभर किंवा ६ ते ८ तासांसाठी विरजण्यासाठी ठेवून द्या. अशा पद्धतीने घरच्याघरीच दही (add this one thing in milk to set perfect curd) अतिशय घट्ट आणि मलाईदार तयार होईल.
बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ! घरीच करा उडपी स्टाईल खमंग डाळ वडे - गुलाबी थंडीतील झक्कास बेत...
हिवाळ्यात दही लावताना घ्यायची काळजी...
थंडीच्या दिवसात दही लवकर लागत नाही, त्यासाठी खालील ट्रिक्स वापरा...
१. दही विरजण्यासाठी नेहमी उबदार किंवा गरम जागा निवडा.
२. तुम्ही प्रेशर कुकरचा वापर करू शकता. कुकर थोडा गरम करून घ्या, त्यात वर्तमानपत्र अंथरून त्यावर दह्याचे भांडे ठेवा आणि कुकरचे झाकण लावून रात्रभर राहू द्या.
३. आपण कॅसरोलमध्येही दही लावू शकता. कॅसरोलमध्ये भांडे ठेवल्यानंतर त्याला जाड कपड्याने झाकून ठेवा.
खमंग खुसखुशीत मेथी वडी एकदा करा, चव अशी की साऱ्या घराचा फेवरिट पदार्थ! पाहा रेसिपी...
विकत सारखेच घट्ट व दाटसर दही घरी तयार करण्यासाठी...
१. टोन्ड किंवा स्किम्ड दूध वापरल्यास दही पातळ होते. म्हशीचे किंवा फुल क्रीम दूध सर्वात उत्तम.२. दूध ५ ते ७ मिनिटे उकळून १० ते १५ % आटवले की दही आपोआप घट्ट व दाटसर तयार होते. ३. फार गरम किंवा फार थंड दूध असेल तर दही नीट लागत नाही.४. जास्त विरजण घातल्यास दही आंबट होते. १ लिटर दुधासाठी फक्त १ चमचा दही पुरेसे आहे.५. दही लावताना हिरव्या मिरचीचे किंवा सुक्या लाल मिरचीचे देठ घाला यामुळे दही घट्ट आणि दाटसर बसते, आंबटपणा येत नाही.६. भांड्याला झाकण लावून एकाच ठिकाणी ठेवा वारंवार हलवू नका, दही लागताना भांडे हलले तर दही सैल किंवा पातळ होते.
Web Summary : Make thick, creamy curd at home by adding milk powder to warm milk. No need for long hours of boiling. This simple trick ensures perfect, market-like curd every time, even in winter, by keeping it warm.
Web Summary : गुनगुने दूध में मिल्क पाउडर मिलाकर घर पर गाढ़ा, मलाईदार दही बनाएं। उबालने की ज़रूरत नहीं। यह आसान ट्रिक हर बार एकदम सही, बाजार जैसा दही सुनिश्चित करती है, यहां तक कि सर्दियों में भी, इसे गर्म रखकर।